खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संपूर्ण कायदा व सुव्यवस्था बिघडली असून तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने हेस्काॅम खाते अपयशी ठरले आहे. शेतकरी वर्गाची कर्जमाफी, अतिदुर्गम व जंगल भागातील शेतकरी वर्गावर नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा सतत धोका त्यामुळे पीके गमावली आहेत. तालुक्यातील तरूण शासकीय गैरसोयीमुळे उपजीविकेसाठी गोवा, महाराष्ट्र राज्यात …
Read More »बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत उत्साहात
बेळगाव : सांबरेकर गल्ली, येळ्ळूर येथील अमर शिवसेना युवक मंडळातर्फे आयोजित माणसाने बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत नुकतीच उत्साहात पार पडली. सदर शर्यतीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल उपस्थित होते. विशेष म्हणजे गोरल यांनी स्वतः बैलगाडी ओढून शर्यतीचे उद्घाटन केले. आपल्या समायोजित उद्घाटन पर …
Read More »गर्लगुंजी येथे उद्या भव्य कबड्डी स्पर्धा
खानापूर : गर्लगुंजी येथे रविवार दिनांक 30/10/2022 रोजी माऊली ग्रुप गर्लगुंजीतर्फे कर्नाटक राज्य मर्यादित भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गर्लगुंजी ग्रामस्थांनी खानापूर तालुक्यातील जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती “एकी की बेकी” या वादात …
Read More »सनई चौघडे वादनाने निपाणी उरुस विधींना प्रारंभ
विविध कार्यक्रमाचे आयोजन : कव्वालीचा बहारदार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरूसास अभंगस्नानाने सुरुवात झाली होती. यानंतर शनिवारी (ता.२९) दर्गा, समाधीस्थळी सनई चौघडे वादनास सुरुवात झाली. उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई …
Read More »1 नोव्हेंबर काळ्यादिनाच्या सायकल फेरीत सामील व्हा!
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना अंमलात आली. पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील तसेच हैद्राबाद संस्थानातील बिदरमधील मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो आणि संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार …
Read More »चिखले-आमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा
खानापूर : खानापूर तालुक्यातील चिखले-आमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. खानापूर तालुक्यातील चिखले- आमगाव हा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. चिखले गावाच्या रस्त्याचे यापूर्वी डांबरीकरण झाले आहे. मात्र चिखलेपासून आमगावला जाणाऱ्या संपर्क रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर …
Read More »बेळगाव-चोर्ला घाटात कारचा स्फोट
खानापूर : धावत्या कारमध्ये स्फोट होऊन बघता बघता कारने पेट घेतल्याची घटना बेळगावजवळील चोर्ला घाटात घडली. गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारला आज शनिवारी पहाटे चोर्ला घाटात आग लागली. नंतर कारने पूर्णपणे पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी लागलीच गाडीबाहेर धाव …
Read More »शालेय विद्यार्थिनींच्या वतीने अनोख्या पद्धतीने दिपावली सण साजरा
बेळगाव : श्री मंगाई देवी युवक मंडळ-मंगाई देवस्थान या मंडळातील दोन शालेय विद्यार्थिनींनी दिपावलिनिमीत्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. स्फुर्ती विश्वनाथ सव्वाशेरी (ई. 7 वी बालिका आदर्श स्कूल) राहणार वडगाव व प्रणाली परशराम कणबरकर (ई.10वी डिवाईन मर्सी) राहणार मच्छे या दोन विद्यार्थिनींनी त्यांना शिवजयंती उत्सवावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या …
Read More »स्व कौशल्य माणसाला उच्च शिखरावर पोहोचविते : डॉ. विद्या जिर्गे
बेळगाव : बेळगाव मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण नीती (एन.ई.पी.) पाठ्यक्रमानुसार शिकणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांच्यासाठी “स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च मेथोडोलॉजी “विषयावर एकदिवशीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून खानापूर सरकारी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रमुख डॉ. विद्या जिर्गे या उपस्थित …
Read More »शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथे ऊसाला आग
चार लाखाहून अधिक नुकसान : शेतकरी अडचणीत निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथील सुमारे तीन एकर ऊसाला अचानक आग लागल्याने चार लाखावर अधिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी घडली. हुपरी रस्ता लगत असलेल्या संदीप माळी यांचे दोन एकर तर सतीश मधाळे यांचे एक एकरच्या ऊसाला शॉर्टसर्किट मुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta