बेळगाव : ‘बेळगावचा राजा’ श्री गणेशाला भक्तांकडून 15 किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. सद्भावनेनी हा चांदीचा मुकूट बेळगावचा राजाच्या चरणी अर्पण केलेला आहे. हा सोहळा गुरुवार दि. 21 ऑगष्ट रोजी सायंकाळी 5.00 वा श्री. चवाटा मंदीर चव्हाट गल्ली बेळगाव येथून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी …
Read More »येळ्ळूर येथील जवानाचा लखनऊ येथे मृत्यू
बेळगाव : येळ्ळूर संभाजी गल्ली येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान राहूल आनंद गोरल (वय 33 ) यांचा लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले काही महिन्यांपासून ते आजारी होते. सैन्य दलाच्या कार्यालयातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोपानुसार त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार रोजी सायंकाळी 5 वा. येळ्ळूर स्मशानभूमीत …
Read More »बालविवाह, देवदासी प्रतिबंधक कायदा कर्नाटकातील वरिष्ठ सभागृहात मंजूर
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून विधान परिषदेत विधेयके सादर बेंगळुरू : बालविवाह प्रतिबंधक (सुधारणा) कायदा आणि देवदासी प्रतिबंधक कायदा, जे विधान परिषदेत मंजूर झाले होते, त्यांनाही विधान परिषदेकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यासह, सरकारने बालविवाह आणि देवदासी या सामाजिक दुष्कृत्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. बुधवारी, पावसाळी …
Read More »जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोटीतून घेतला पूर परिस्थितीचा आढावा!
चिक्कोडी : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर असल्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज चिक्कोडी तालुक्यातील यड्डूर गावातील कृष्णा नदीतील पूर परिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. शेजारच्या महाराष्ट्रात वाढलेल्या …
Read More »30 दिवसांची तुरुंगवारी; मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची जाणार
नवी दिल्ली : देशभर विरोधकांनी व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन रान उठवले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना थेट घरी बसवण्यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडले आणि विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला.. अमित शाहांनी लोकसभेत मांडलेल्या 130 व्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जेलवारी झाल्यास त्यांची हकालपट्टी निश्चित करण्यात …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या भजन स्पर्धा संपन्न; महिला गटात मुक्त ग्रुप व पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ अव्वल
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्या वतीने १७ ते १९ ऑगस्ट पर्यंत मराठा मंदिर येथे घेण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धा उत्साहाने संपन्न झाल्या. महिलांचे १९ आणि पुरुषांचे १२ गट सहभागी झालेल्या या स्पर्धेतील पहिला क्रमांक महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी आणि पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ, …
Read More »युवा समितीच्या वतीने जांबोटी, कणकुंबी आणि बैलूर सीआरपी विभागातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : मातृभाषेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच दुर्गम भागातील इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले . जांबोटी सी.आर.पी. मधील आमगाव, आमटे, चापोली, चिरेखानी, गवसे, हब्बनट्टी, जांबोटी, कालमनी, ओलमणी, वडगाव, विजयनगर तर कणकुंबी सी.आर.पी. मधील बेटणे, हुंळंद, पारवाड, चिखले, चोर्ला, मान, …
Read More »अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन गांभीर्याने!
बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व प्रगतशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जीएसटी अप्पर आयुक्त श्री. आकाश चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवराज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीला …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. …
Read More »विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta