Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

माजी नगरसेविकेचे घर जाळण्याचा प्रयत्न! ; पोलिसांत गुन्हा दाखल

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर दगड फेकून आणि घरात फटाके फोडले. अभय पाटील यांची मिरवणूक निघाली असताना होसुर येथील सुधा भातकांडे यांच्या घरावर मिरवणुकीतील काही जणांनी दगडफेक करून सी सी टी व्ही कॅमेरा …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक हरिभाऊ वझे यांचे निधन

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माननीय श्री. हरिभाऊ वझे यांचे दिनांक 13 रोजी दुःखद निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. ते 1956 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते ते मूलतः बेळगावचेच होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते संघाचे स्वयंसेवक होते. एम एस सी पदवी पूर्ण केल्यानंतर ते …

Read More »

निपाणीतून शशिकला जोल्ले तिसऱ्यांदा विजयी; उत्तम पाटलांची कडवी लढत!

  निपाणी : निपाणी विधानसभा मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी विजयाचे खाते उघडले असून शशिकला जोल्ले यांनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी शशिकला जोल्ले यांना शर्थीची लढत दिली. मात्र शेवटी शशिकला जोल्ले यांच्याच विजयाचा गुलाल उधळला असून या मतदार संघाच्या मतमोजणीदरम्यान आघाडी आणि पिछाडीच्या …

Read More »

हुक्केरीतून निखिल कत्ती विजयी

  बेळगाव : हुक्केरी मतदार संघावर गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या कत्ती कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीला जनतेने आमदारकी बहाल केली असून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे सुपुत्र निखिल कत्ती यांनी या निवडणुकीत विजयश्री मिळविली आहे. विश्वनाथ कत्ती यांच्यानंतर उमेश कत्ती आणि आता निखिल कत्ती अशा पद्धतीने तिसऱ्या पिढीने राजकारणात यशस्वी प्रवेश …

Read More »

खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठलराव हलगेकर विजयी

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीतील खानापूर मतदार संघात भाजपचे उमेदवार विठ्ठलराव हलगेकर यांनी ९१७७५ मते घेऊन विजय संपादन केला. यांच्या विजयाने खानापूर शहरासह तालुक्यात विजयोत्सव साजरा झाला. शनिवारी दि. १३ रोजी बेळगांव येथील आर पी डी काॅलेज मध्ये मतमोजणी पार पडली. यावेळी खानापूर मतदार संघातून भाजपचे …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. अनेक मतदारसंघांचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले असून काही मतांची मोजणी सुरू आहे. अथणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, कित्तूर, रामदुर्ग, कागवाड, चिक्कोडी, यमकनमरडी, बैलहोंगल आणि कुडची येथे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. बेळगाव दक्षिण, खानापूर, …

Read More »

कर्नाटकमधील पराभवाने भाजपच्या ‘मिशन 2024’ ला बसणार धक्का?

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागणार आहेत. मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) चिंता वाढवली आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 ते 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. …

Read More »

खानापूर तालुक्यात आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी दि. १३ रोजी होणार आहे. यासंदर्भात खानापूर मतदार संघात खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दि. १३ रोजी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत १४४ अन्वये दारूबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तेव्हा रॅली, प्रतिकृती जाळणे, लाऊडस्पीकरचा वापर करणे सक्त मनाई आहे. आदेशाचे …

Read More »

उद्या दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील : जिल्हाधिकारी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात जमा करण्यात आली असून उद्या शनिवारी दुपारपर्यंत सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बोलून दाखविली. आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये …

Read More »

थांबलेल्या दोन कंटेनरसह १६ कार जळून खाक; कोट्यावधीचे नुकसान

  पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना निपाणी : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या हिटणी फाटा येथे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या धाब्यावर थांबलेले होते. अचानपणे दोन कंटेनरना आग लागली. या आगीत कंटेनरमध्ये असलेल्या 16 कार कारसह दोन कंटेनर जळून खाक झाले आहे. यामध्ये कोट्यावधीची हानी झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही …

Read More »