बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डोळे दीपतील बेळगावच्या राजाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. दरवर्षी गणेशोत्सवात ‘बेळगावचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर ग्रामीण भागातील भाविक आगमन सोहळ्याला धर्मवीर संभाजीराजे चौकात येत असतात. शुक्रवारी रात्री 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकात 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा राजा’चे दिमाखात आगमन होताच राजाचे आगमन …
Read More »केएसआरटीसी बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडक: तिघांचा मृत्यू
रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. …
Read More »बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्हा आघाडीवर होता : पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक लढाईतून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे. स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याची भूमिका कमी नाही. देशाला अतुलनीय सेनानी, खरे देशभक्त आणि स्वाभिमानी …
Read More »देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू
राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेने जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे …
Read More »दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित प्रकल्प लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगावकर जनतेचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्प, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवनाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील महिन्यात उद्घाटन करतील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पाटबंधारे …
Read More »बेळगाव शहर परिसरातील अनधिकृत ब्युटी पार्लर, रुग्णालये, क्लिनिक, स्किन केअर सेंटरवर छापेमारी
बेळगाव : नियमांचे उल्लंघन केलेल्या बेळगाव शहर परिसरातील शहरातील अनेक अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि रुग्णालयांवर आरोग्य विभागाने आज मोठी छापेमारी केली. शुक्रवारी (15 ऑगस्ट) बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या निर्देशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गदादी यांनी ही कारवाई केली, ज्यामध्ये 30 अनधिकृत रुग्णालये, क्लिनिक आणि …
Read More »प्रेयसीची चाकूने वार करून केली हत्या; प्रियकराचीही आत्महत्या!
खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कलखांब येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण
बेळगाव : कलखांब येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. माजी एसडीएमसी अध्यक्ष भरमा पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी आदी …
Read More »शाॅपिंग उत्सवला आजपासून शानदार प्रारंभ….
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात पर्यटन, इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, वस्त्र प्रावरणे, ज्वेलरी, गुंतवणूक, विमा व रुचकर शाकाहारी खाद्य प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे आज शुक्रवार दि. 15 ते मंगळवार दि. 19 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta