खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवारी (ता. १५) रोजी दुपारी साडे तीन वाजता विठ्ठल मंदिर येथे हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा व गुंडपी गावातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा इयत्ता चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी व आठवी ते दहावी या …
Read More »मुतगा कृषी पत्तीन सोसायटीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट; लवकरच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा!
बेळगाव : मुतगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देत नसल्याच्या निषेधार्थ तसेच सोसायटीतील गैरव्यवहाराबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच मुद्द्यावरून सचिन पाटील यांनी उपोषण केले होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या …
Read More »आर्मी पब्लिक स्कूलची द. विभागीय ज्युडो स्पर्धेत चमकदार कामगिरी
बेळगाव : आर्मी पब्लिक स्कूल, एमएलआयआरसी बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी शिर्डी, महाराष्ट्र येथे नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई दुसऱ्या दक्षिण विभागीय ज्युडो चॅम्पियनशिप -2025 स्पर्धेमध्ये 12 पदके जिंकत चमकदार कामगिरी नोंदवली असून या शाळेच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिर्डी, महाराष्ट्र येथे गेल्या दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट …
Read More »बेळगावमध्ये नादसुधा सुगम संगीत शाळेचा स्थापना दिन साजरा
नादसुधा बेळगावमध्ये संगीताचा प्रसार करत आहे आणि मुलांमध्ये संगीताची गोडी निर्माण करत आहे – एल.एस. शास्त्री बेळगाव: येथील नादसुधा सुगम संगीत शाळेचा १६ वा स्थापना दिन सोहळा रविवारी शहरातील टिळकवाडी येथील पिंक व्हरांडा जवळील नादसुधा संगीत शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कवी, कलाकार, पत्रकार एल.एस. शास्त्री म्हणाले, नादसुधा सुगम …
Read More »शेततळ्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; कोप्पळ जिल्ह्यातील घटना
कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील कुष्टगी तालुक्यातील बिजकल गावात शेततळ्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिजकल गावाच्या बाहेरील एका शेतात ही घटना घडली. ग्रामपंचायत अध्यक्ष संगप्पा थेग्गीनमनी यांचा मुलगा श्रवणकुमार (८) आणि मल्लम्मा निलप्पा थेग्गीनमनी अशी मृतांची नावे आहेत. मुले त्यांच्या कुटुंबाच्या शेतात गेली असताना ही दुर्घटना घडली. पावसामुळे …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्या शाळेच्या ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे महत्व …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न
विविध स्पर्धां व परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरूवातीला उपस्थितांचे स्वागत इंद्रजित मोरे यांनी केले. या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी रौप्य महोत्सवी वर्ष …
Read More »कॉंग्रेस सरकारच्या अपयशाविरोधात भाजप-धजदची निदर्शने
बंगळूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सरकारच्या अपयशांविरुद्ध निषेधाचे हत्यार उपसले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच, भाजपने काँग्रेस सरकारच्या अपयशांविरुद्ध सभागृहाबाहेर निदर्शने केली. आज विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, भाजप आणि धजदच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी विधानसौध परिसरातील गांधी पुतळ्याजवळ सरकारच्या अपयशाविरुद्ध धरणे आंदोलन केले. …
Read More »कर्नाटकचे सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
“मतचोरी” वरील वक्तव्यानंतर हायकमांडचे निर्देश बंगळूर : गेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारच्या काळात “मतचोरी” झाली, असे जाहीर विधान केल्यानंतर कर्नाटकचे सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांना विधानसभेत …
Read More »समादेवी गल्ली परिसरातील अतिक्रमणावर वाहतूक पोलिसांची कारवाई
बेळगाव : समादेवी गल्ली परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आज पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मोहीमेदरम्यान रस्त्यावर ठेवलेले टेबल, स्टॉल, फळे-भाजीचे टपरे, दुचाकी व इतर अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात आल्या. पुढील काळात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला. कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta