पोलीस अधीक्षक कार्यालय आढावा बैठकीत प्रतिपादन कोल्हापूर : महिलांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीतून त्यांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित महिला तक्रार अर्जदारांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अर्जदार महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी …
Read More »कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; कुडची पूल पाण्याखाली
बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे चिक्कोडी उपविभागातील कृष्णा आणि दुधगंगा नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. सध्या, कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे महाराष्ट्राशी जोडणारा कुडची-उगार पूल पाण्याखाली गेला आहे. लोकांनी पूल ओलांडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. कृष्णा नदीवरील पूल, …
Read More »झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
देवघर : कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया फॉरेस्ट परिसरात हा अपघात झाला. ही बस गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर धडकली. त्यानंतर हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक …
Read More »कन्नडसक्ती विरोधी महामोर्चाला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा जाहीर पाठिंबा
बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समिती बैठक सोमवारी दि. 28/07/2025 रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये बेळगांव महानगर पालिकेमध्ये मराठी परिपत्रक मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नगरसेवकानी मराठी बाणा दाखविल्याबद्दल नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, या तिन्ही नगरसेवकांचे …
Read More »ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष जे एम जैनेखान आणि सचिव मडप्पा भजंत्रि यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीच्या ध्येयधोरणानुसार निपाणी तालुका युवा समिती कार्य करणार!
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका आणि युवा समिती निपाणी तालुका यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यामध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मत्तीवडे येथे बैठक पार पडली. सीमाभागात चालू असलेली कन्नडसक्ती, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने सीमा भागातील मराठी भाषिक जनतेला त्यांच्या भाषेतून मराठी …
Read More »नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
गुजरातमधील वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीणीसाठी केलेल्या प्रयत्नांवर …
Read More »महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी!
दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास मुंबई : जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला …
Read More »हेरॉईन विक्री करणारे त्रिकूट गजाआड; 48 हजाराचे हेरॉईन जप्त
बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर सातवा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 48 हजार 400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त …
Read More »गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : गर्लगुंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलुर या गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल सदर गावाना दत्तक घेणार असल्याची माहिती गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील दिली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta