संजीवीनी फौंडेशन मध्ये योग दिन उत्साहात साजरा बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फाउंडेशनमध्ये योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले योग शिक्षक विजय बन्सुर यांनी योगाचे महत्त्व विशद करताना, योगासन केल्याने आरोग्य स्वस्थ आणि सुंदर राहते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन …
Read More »अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान बेळगावच्या शिवसैनिकांची पोलिसांकडून अडवणूक
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेळगावच्या शिवसैनिकांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, त्यांनी केवळ निवेदनात्मक फलकांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ‘चलो कोल्हापूर’ आंदोलनात सहभाग अमित शहा यांच्या …
Read More »सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा
सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत कंपनीचे खाजगीकरण करुन टाटा पॉवर सारख्या खाजगी कंपनीना विद्युत पुरवठा करण्याची परवानगी देऊन खाजगीकरण करण्याचा सरकारने घाट घातला असून त्याला २३ जून पूर्वी आक्षेप असल्यास नोंदवावा लागणार, अशा प्रकारे खाजगीकरण करुन समस्त शेतकऱ्यांची, नोकरवर्गाची, व्यावसायिकांची गैरसोय करत आर्थिक …
Read More »“माझ्या पराभवामागे संगनमत होते का?” – माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
बेंगळुरू / खानापूर : कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामागे संगनमत होते का? मला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा थेट …
Read More »बसच्या तिकीट दरवाढीवर संतुलित निर्णय घेऊ
मुख्यमंत्री शिवकुमार, बस भाडेवाढीचे दिले संकेत बंगळूर : राज्य परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे, तसेच सर्वसामान्य प्रवाशांचाही हितसंबंध अबाधित राहिला पाहिजे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन बसभाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, खासगी …
Read More »गृहलक्ष्मी, गृहज्योती वीज योजनेची घरोघरी पडताळणी
लाभार्थ्यांकडून स्वघोषणापत्र घेणार बंगळूर : गृहलक्ष्मी आणि गृहज्योती (गृहमोफत वीज) योजनांमधील अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, त्यांच्याकडून स्वाक्षरीसह स्वघोषणापत्रही घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हमी योजनांच्या आढावा बैठकीत हा …
Read More »अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना
मिनाक्षी पाटील; बोरगाव येथे स्वयंपाक गॅसचे वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्च महिन्यात गॅसची कमतरता असल्याने मंजूर झालेल्या गॅस लाभार्थ्यांना वितरित करता आल्या नव्हत्या. आता गॅस उपलब्ध झाल्यानंतर उत्तम पाटील यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आज …
Read More »खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन
खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्थानिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका घटकाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे सीमाभागातील कायदा व …
Read More »कन्नडसक्तीविरोधी मोर्चाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा
बेळगाव : शनिवार दिनांक 20/6/2026 रोजी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय श्री बालशिवाजी वाचनालय येळ्ळूर येथे पार पडली. बैठकीमध्ये सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी मध्यवर्तीं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या, दिनांक 21 जून रोजी दुपारी 3.00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस मध्यवर्ती समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta