पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत एकूण 7 जिवंत चित्ररथ (लाईव्ह देखावे) सादर करण्यात येणार असून, मिरवणूक रात्री 8 वाजल्यानंतर सुरू होऊन वडगावमधील …
Read More »निपाणीसह परिसरात शिव-बसव जयंती, अक्षय तृतीयेच्या तयारीची लगबग
निपाणी (वार्ता) : शिव-बसव जयंती आणि अक्षय तृतीयेला केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शिव- बसव जयंतीसह अक्षय तृतीया सणाच्या तयारीची शहरासह ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. येथील बाजारपेठेत जयंतीसाठी लागणारे नानाविध आकाराचे भगवे ध्वज आणि त्यावर शिव -बसव प्रतिमा असणारे ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विविध …
Read More »निपाणीत उन्हाचा कहर, पारा ४० अंशावर
निपाणीकर घामाघुम; चार दिवसापासून उष्णतेची लाट कायम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात मागील ४ दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. बुधवारी (ता.१५) पारा ४० अंशावर स्थिरावला. उष्म्यामुळे निपाणीकर घामाघूम होत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठ दुपारी ओस पडत आहेत. एप्रिलमध्ये उन्हाचा …
Read More »मनगटात शिवराय आणि डोक्यात भिमराव जर असतील तर कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही : शुभम शेळके
तुडये : भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, …
Read More »सीमा प्रश्नासंदर्भात समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
बेळगाव : 22 वर्षे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला खादरवाडी येथील समिती कार्यकर्ते प्रकाश नेसरकर यांनी एक पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून संबंधित प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका सामान्य समिती कार्यकर्त्याच्या पत्रामुळे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने बेळगाव …
Read More »रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युती संदर्भात खानापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी म्हणाले की, तालुक्यातील जनतेने विचारवंत, शिक्षक, शिक्षित उच्चशिक्षित, वारकरी, समाजप्रबोधनकार यांना प्रबोधन करण्यासाठी बोलवावे ना की रौडीशिटर ना. समाज म्हणून …
Read More »महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान
मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि …
Read More »सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी
कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली म्युनिसिपल मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मांगले (जि.सांगली) येथील संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते २ लाखाचे रोख …
Read More »योगेश गौडा खून प्रकरणी माजी मंत्री विनय कुलकर्णी दोषी
लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचा निर्णय बंगळूर : भाजपचे नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह इतर आरोपींना दोषी ठरवण्याचा आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल जाहीर केला. शिक्षेचे प्रमाण उद्या (ता. …
Read More »आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : श्री आदिचुंचनगिरी मठाने मांडलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन केल्यास ‘विकसित भारत’चा मार्ग अधिक सोपा आणि व्यवहार्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नागमंगल तालुक्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करताना त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta