Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण झाले आत्ता गटारी केव्हा?

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी २० कोटीचा रूपयाचा निधी मंजुर करून दोन वर्षापूर्वी कामाचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत केवळ रस्त्याचे डांबरीकरण तेवढेच झाले. मात्र गटारीचे काम अद्याप झाले नाही. गटारी न झाल्याने गाळे उभारण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी गाळे …

Read More »

वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वारसांना एस. एस. फाऊंडेशनची मदत

बेळगाव : अकाली निधन पावलेले वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी आणि परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबाला एस. एस. फाऊंडेशनतर्फे मदत वितरित करण्यात आली. तसेच मुरगोडचे आजारी पत्रकार महांतेश बाळीकाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी …

Read More »

प्रोत्साह फाऊंडेशनच्या वतीने समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन

बेळगाव : बेळगावातील प्रोत्साह फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता महांतेश नगर येथील महंत भवनात समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन स्नेहल रायमाने (आय. ए. एस.) करणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कलबुर्गी ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीगुड उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळची पूर्वतयारीची सभा

बेळगाव: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पूर्वतयारीची सभा घेण्यात आली या सभेला दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आंबेडकर उद्यानात झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अशोक सर्कल येथून …

Read More »

कुख्यात डॉन बनंजे राजासह चौघांना जन्मठेप

बेळगाव कोका न्यायालयाचा निर्णय बेळगाव : कुख्यात डॉन बनंजे राजा याला अंकोल्याचे उद्योजक अन भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगाव येथील कोका न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. ३ कोटी रुपयांची सुपारी घेऊन उद्योजक आर. एन. नायक यांची २१ डिसेंबर २०१३ रोजी हत्या करण्यात …

Read More »

धावत्या कारने घेतला अचानक पेट

बेळगाव : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रसंग आज चन्नम्मा सर्कल जवळील संगोळी रायान्ना मार्गावर घडला. यावेळी अचानक कारमधून धूर निघाल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी मोठा अनर्थ घडू नये याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदर घटना आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली …

Read More »

निपाणीत युवकाचा खून

एक जण ताब्यात : पैशाच्या देवघेवीवरून कुणाचा संशय निपाणी (विनायक पाटील) : मूळ गाव सैनिक टाकळी आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या …

Read More »

मराठा समाजात विवाह वेळेवर होण्याबाबत प्राधान्य द्यावे : प्रकाश मरगाळे

बेळगांव : मराठा समाजात आता विवाह वेळेवर होण्याबरोबर इच्छूक मुलींनीही नोकरीवाल्याबरोबर व्यावसायिक मुलांना प्राधान्य द्यावे, असे मत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. गोवावेस येथील मराठा मंदिर येथे मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी मंडळाचे हितचिंतक शंकरराव पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

समर्थ नगर येथील श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाकडून नववर्षाचे उत्साहात स्वागत

बेळगाव : समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर यांच्यावतीने लहान मुला-मुलींसाठी पारंपारिक वेशभूषा करून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न मंजुषा, तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी समर्थ नगरमधील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

बेकवाडच्या ग्रा. पं. सदस्याचा रोहयो कामात मनमानी झाल्यासंदर्भात उद्या आंदोलनाचा इशारा

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील खैरवाडात रोजगार हमी योजनेअंतर्गत यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली आहे. सरकारने गरीब जनतेच्या हाताला कामे मिळावी. त्या गरीब जनतेला पोट भरावे. या उद्देशाने …

Read More »