माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तसेच त्यांचा जन्मशताब्दी वर्ष निमित्त माणगांव शहर येथे मंगळवार दि. 01 मार्च 2022 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियान शासकीय मध्यवर्ती कार्यलयाच्या परिसरातून सकाळी ठिक 07:30 वाजता सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजीपचे माजी सभापती राजीवजी …
Read More »रांगोळी प्रदर्शनातून अवतरले विज्ञानाचे धडे!
कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रांगोळीतून विविध आकृत्या रेखाटून त्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात दिली. त्यामुळे रांगोळीतून विज्ञानाचे धडे अवतरल्याचे प्रदर्शनात पहावयास मिळाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंटच्या महसूल अधिकारी प्रियंका पेटकर यांच्या हस्ते …
Read More »रशिया- युक्रेन युद्धात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
बेंगळुर : युक्रेनमध्ये आज रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. नवीन शेखरप्पा (वय 21) असे त्याचे नाव असून तो कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगिरी गावचा आहे. तो खारकीव येथे शिक्षणासाठी गेला होता. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज सकाळी खार्किवमध्ये …
Read More »शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सव भक्तीभावात
बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असे म्हणतात की भगवान शंकराचा वास हा स्मशानात असतो, स्मशानातील भस्म शरीराला लावून भोळा शंकर स्मशानात राहत असे अश्या आख्यायिका प्रचलित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्रास हिंदू स्मशानात शिवालय असते. तसेच एक शिवालय शहापूर …
Read More »श्री बसवाण्णा महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त महापूजा
बेळगाव : शाहूनगरमधील बसवण्णा मंदिर कमिटीच्यावतीने महाशिवरात्री निमित महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी मंदिर कमिटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. या निमित्ताने सकाळी कमिटी अध्यक्ष श्रीकांत कदम, उपाध्यक्ष श्री. बामणे, श्री. अंगडी यांचेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मंदिरात बसवण्णा महादेवाचे विधीवत पूजन करून महापूजा करण्यात आली. त्यानंतर कमिटीच्यावतीने नगरसेविका …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त मलप्रभा नदी घाटावर भाविकांची गर्दी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी मंगळवारी दि. 1 मार्च रोजी महाशिवारात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते. यावेळी मलप्रभा नदी काठावर नैवेद्य व महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे आयोजन …
Read More »लसीकरणाची गरज शासनालाच?
दुसर्या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र …
Read More »’देवचंद’ मध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): देवचंद महाविद्यालयापासून सुरु होणार्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि गुणगौरव समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त डी.टी.एस.( देवचंद टॅलेंट सर्च) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विद्यार्थ्यांना …
Read More »खानापूर आरोग्याधिकार्याचे बनावट शिक्के, सही वापरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी दवाखान्यात आरोग्य अधिकार्याचे बनावट शिक्के व सही वापरून संध्या सुरक्षा पेन्शन योजनेचा लाभ देणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासु गुरव रा. मेंडेगाळी ता. खानापूर व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी इस्माईल बिडीकर यांनी मिळून हे कृत्य केले आहे. या …
Read More »जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानची भुमिका महत्त्वाची : सरोज पाटील
कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान सोहळा निपाणी (वार्ता) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक सुखकर झाली. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. विज्ञानाने अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta