Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

सृजनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे : ज्येष्ठ विचारवंत अध्यक्ष श्री. आर. वाय. पाटील

दमशी मंडळ मंडळ बीके कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प, 25 जून रोजी बैठकीचे आयोजन बेळगाव : कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम थांबले केले होते; ते पुन्हा नव्या दमाने चालू करून सृजनात्मक उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. …

Read More »

गायब आमदारापैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार – उद्धव ठाकरे

मुंबई : मला दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं….तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नकोय, त्यांनी समोर येऊन सांगावं.. आज …

Read More »

कणकुंबी, तळावडे शाळेत योग दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली विद्यालयात तसेच तळावडे मराठी शाळेत राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष तसेच विश्व भारती क्रीडा संकुलन जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, अनिल देसाई एक्स आर्मी, विश्व भारती क्रीडा संकुलन खानापूर तालुका …

Read More »

वेदगंगा नदी काठावरील केबलची चोरी

सौंदलगा : सौंदलगा येथील गुजर मळा, साळुंखे मळा, वेदगंगा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारीसह इतर आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सुमारे ८०० फूट केबलची चोरी झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गुजर मळ्यातील रयत नामदेव साळुंखे, रविवारी रात्री सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गौंडवाड ग्रामस्थांचा आक्रोश

बेळगाव : गौंडवाड येथे देवस्थान जमिनीच्या वादातून सतीश राजेंद्र पाटील याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणानंतर गौंडवाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपीला अटक करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. आरोपींनी पुन्हा धमकी दिली असून तातडीने त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समस्त गौंडवाड ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

जनतेच्या समस्या निवारणाला प्राधान्य द्या : आ. श्रीमंत पाटील

शिरगुप्पी ग्रामपंचायतीत तक्रार निवारण बैठक शिरगुप्पी : अधिकारी असोत वा लोकप्रतिनिधी त्यांनी गावातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यायला हवे. शिरगुप्पी ग्रामपंचायत याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी गावच्या विकासाला जे प्राधान्य दिले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शिरगुप्पी ग्रामपंचायतीत …

Read More »

मंडोळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल, मंडोळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच खेळीमेळीत उत्साहाने पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डी. एल. आंबेवाडीकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बालकांची जबाबदारी व …

Read More »

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवांची ज्योतिबा मंदिरला भेट

बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडी यांनी बेळगावच्या श्री ज्योतिबा देवस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांचा बेळगावातील चव्हाट गल्ली ज्योतिबा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. बेळगावातील ज्योतिबा मंदिराचे सागवान नवरंग लाकडी गाभाऱ्याचे कामाचे कौतुक करत बेळगावची ज्योतिबा सासनकाठी यंदाच्या वर्षी ज्योतिबा यात्रेत दिलेली भेट शिस्तबद्ध आयोजनाची आठवण करून …

Read More »

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? पवारांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ता बदलाची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. …

Read More »