Monday , September 21 2026
Breaking News

मध्य प्रदेशमधील भीषण अपघातात महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

Spread the love

 

भोपाळ : मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले.
एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *