Sunday , July 26 2026
Breaking News

सुख, समाधान, कल्याणासाठी सिद्धचक्र आराधना विधान

Spread the love
युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत परिवाराकडून विधानाचे आयोजन
निपाणी (वार्ता) : धावपळीच्या युगात प्रत्येकांना अध्यात्म आणि सुख समाधान पाहिजे. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन साधू मुनींनी  त्याग केले आहे. त्यांनी केलेले त्याग हे समस्त मानव जातीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आचारविचारातून प्रत्येक श्रावक अध्यात्मकडे वळत आहे. अध्यात्म बरोबरच श्रावक श्राविकांना सुख, समाधान मिळावे यासाठी श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत परिवाराकडून सिद्धचक्र आराधना विधानाचे आयोजन केले असल्याची माहिती, बस्ती कमिटीचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
श्री 1008  दिगंबर जिन मंदिर येथे आर्यिका रत्न गनिनी प्रमुख  मुक्ती लक्ष्मी माताजी तसेच आर्यिका रत्न निर्वाण लक्ष्मी माताजी यांच्या दिव्य सानिध्यात मंगळवार (ता. १) ते मंगळवार (ता. ८) अखेर सिद्धचक्र आराधना महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १)रोजी ध्वजारोहण करण्यात आले.
विधानधारक अभिनंदन पाटील व विनयश्री पाटील दापत्यांच्या हस्ते, तसेच जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष उत्तम पाटील व धनश्री पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधिवत पूजा करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर जीनमंदिर येथे पंचामृत अभिषेक करण्यात आले. दीपप्रज्वलन, मंत्र पठण नंतर सिद्धचक्र आराधना विधानस प्रारंभ झाला.
यावेळी महिलांनी आराधना महोत्सवात सहभाग घेतला. प्रतिष्ठाचार्य अनिलकुमार कलाजे यांनी सर्व विधीचे मंत्र पठण करीत जनकल्याणासाठी प्रार्थना केली. श्रावक रत्न रावसाहेब पाटील व मीनाक्षी पाटील यांनी  विधानाचे औचित्य साधून विविध बिजाक्षराद्वारे पूजा व आराधना करीत श्रावक श्राविकांसाठी सुख समाधान व त्यांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली. सलग आठ दिवस है विधान चालणार असून या विधानात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अरिहंत परिवाराकडून करण्यात आले आहे.
याप्रसंगी श्री १००८ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, श्रावक श्राविका उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *