Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

पंजाबमध्ये आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 मुलांसह सात सदस्यांचा मृत्यू

लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरेश (54), …

Read More »

खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे विविध सरकारी कार्यालयाना निवेदन सादर

बेळगाव : येत्या 25, 26, 27, 28 एप्रिल रोजी होत असलेल्या येळ्ळूर चांगळेश्वरी व कलमेश्वर, यात्रेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस सीपीआय श्रीनिवास हंडा यांना तसेच विविध सरकारी कार्यालयाना येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात …

Read More »

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मन्नोळकरांनी घेतली होती घराची जीपी

बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली होती असे तपासात पुढे आले आहे. मंत्री ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या …

Read More »

सर्वोत्तम मधाळेंची ’सर्वोत्तम’ पेन्सिल आर्ट!

आतापर्यंत रेखाटलेली 60 चित्रे : 5 वर्षापासून जोपासलेला छंद निपाणी (विनायक पाटील) : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. त्यातूनच आपली कला सर्वासमोर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यातून काहीजण अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आडी येथील निवृत्त मुख्याध्यापक सर्वोत्तम मधाळे यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न …

Read More »

मनीषा सुनील शेवाळे यांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील रहिवासी मनीषा सुनील शेवाळे यांना 25 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. सामाजिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित ’भीमपर्व’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री …

Read More »

कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत

अथणी : वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाच जणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व …

Read More »

कुसनाळला मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी

अथणी : कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्‍या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे कुसनाळ गावचे स्थलांतर व्हावे, अशी अपेक्षा आ. श्रीमंत …

Read More »

कबनाळी गावासाठी निवेदनाव्दारे बसची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कबनाळी गावाला खानापूर-कबनाळी अशी बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका विकास आघाडीतर्फे बस आगार व्यवस्थापक महेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापुर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व इतर निवेदनात म्हटले आहे की, खानापूर ते निलावडे मार्गे कबनाळी गावासाठी बस सुविधा व्हावी. कारण …

Read More »

आता सतीश जारकीहोळी यांच्या नावाला कलंक फासण्याचा प्रयत्न

बेळगाव : बंधू रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणानंतर आता केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्या नावाला कलंक फासण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या नावानं पॉर्न साईटवर अश्लील व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अश्लील वेबसाईटवर सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न …

Read More »