बेळगाव (वार्ता) : व्यापार आणि उद्योग धंद्यांचे नुकसान होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे परराज्यातील प्रवाशांना बेळगावातील प्रवेशासाठी करण्यात आलेली आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील फोरमच्या शिष्टमंडळाने …
Read More »चापगांवात पारायण सोहळाला उत्साहात प्रारंभ
खानापूर (वार्ता) : चापगांव (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवारी दि. 2 रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 9 वा आणि 12 ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पीडीओ शिवलिंग मारीहाळ होते. दीपप्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, …
Read More »असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार
खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या …
Read More »दहा रुपयांच्या नाण्याबाबत जनजागृती करा
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास …
Read More »त्या घटनेविरोधात कुद्रेमनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे!
बेळगाव (वार्ता) : कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले …
Read More »संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर आंदोलन छेडणार : प्रमोद मुतालिक
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी दिला आहे. त्यांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला धावती भेट देऊन देवदर्शन घेऊन श्री शंकराचार्य महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. तद्नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोदजी मुतालिक म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपाचे …
Read More »पिग्मी कलेक्टरचा मुलगा बनला पोलीस!
परिसरातून कौतुक : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश निपाणी (विनायक पाटील) : विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने कितनी कलेक्टरचा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची …
Read More »समाजातील अत्याचार संपवण्यासाठी संघर्षाची गरज
मीनाक्षी पाटील : वीतराग महिला मंडळातर्फे हळदीकुंकू निपाणी (वार्ता) : मोबाईल व पाश्त्यात संस्कृतीमुळे देशाची अवस्था पुन्हा आधारलेली असून स्त्रियांवर होणार्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशा अत्याचार संपविण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मोठा संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …
Read More »तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा द्या
मंगलमुखी समुदायाकडून तहसीलदारांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश निपाणी (वार्ता) : तृतीयपंथी लोकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने अशा कुटुंबियांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन येथील मंगलमूर्ती संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, आधार कार्ड, …
Read More »संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेला कोरोना नियम बंधनकारक
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta