Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

मानकापूर कुस्ती मैदानात दोन्ही कुस्त्या बरोबरीत

एकापेक्षा एक अशा कुस्त्यांनी मैदान रंगले : कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात एकापेक्षा एक अशा कुस्त्या झाल्याने या कुस्ती मैदानाला कुस्ती प्रेमींच्याकडून प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांकाची कुस्ती तुषार जगताप- अहमदनगर व हरीश देहल्ली-उत्तराखंड यांच्यात तर दुसर्‍या क्रमांकाची …

Read More »

माझ्या कार्यामुळेच माझा सन्मान : नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव तालुका पत्रकार संघटना आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत असताना नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार म्हणाले की, पत्रकार संघाने आज जो माझा गौरव केला आहे तो माझ्या कर्तृत्वामुळे. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री आदिती तटकरे, माणगांव, महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले, पं. समिती अध्यक्ष अलका जाधव, शिवसेनेचे नेते प्रमोद घोसाळकर, …

Read More »

देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित सौ. इंदुरीकर यांच्या कीर्तन समारंभाला उदंड प्रतिसाद

माणगांव (नरेश पाटील) : मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सौ. इंदुरीकर यांचे कीर्तन तसेच महिला वर्गासाठी पैठणी खेळ 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. जनतेकडून सदर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या विविध खेळांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. पैठणीच्या खेळाचा महिला वर्गाने विशेष आनंद घेतला त्यानंतर कीर्तनाचा …

Read More »

अर्थसंकल्पात कोणतेच अतिरिक्त कर नाहीत

कर्नाटकाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर, विकास योजनावर भर बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी २०२२-२३ या वर्षासाठी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात सामान्यांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकला नाही. त्यांच्या अंदाजपत्रकानुसार, एकूण प्राप्ती २.६१ लाख कोटी रुपये आहे, तर एकूण खर्च २.६५ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. …

Read More »

माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्री उत्साहात साजरी

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव खंदाड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही 41 वे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर ग्रंथाचे सामुदायिक पारायण सप्ताहाचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत करण्यात आले होते. पारायण सोहळ्याचे आयोजन माणगांव सोनभैरव मंदिर खांदाड येथील ग्रामस्थ सद्गुरू सेवा परिवार यांनी केले होते. परमपूज्य श्री सद्गुरू शंकर …

Read More »

मणतुर्गा शिवारात आढळले वाघाच्या पावलांचे ठसे

खानापूर : मणतुर्गा (ता. खानापूर) शिवारात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्यानेही शिवारात आढळलेले ठसे वाघाचे असल्याचे स्पष्ट केल्याने गांभीर्य वाढले आहे. मणतुर्ग्याजवळील जंगलात स्थानिक शेतकऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या होत्या. पण, वाघाने शिवाराच्या दिशेने कधी मोर्चा वळवला नव्हता. चार दिवसांपूर्वी गावापासून काही …

Read More »

बेळगांव जिल्हा बॅंक राज्यात ‘नंबर वन’ : गजानन क्वळी

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात नंबर वन ठरल्याचे नूतन संचालक गजानन क्वळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, आपणाला नामनिर्देश संचालक म्हणून निवड केलेल्या भाजपाचे मंत्रीगण, खासदार आमदार या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानावर …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नचे निधन

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच …

Read More »

वन्यजीवींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

जागतिक वन्यजीव दिन साजरा बेळगाव : वनविभाग व वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला वनविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक अधिकारी विजयकुमार सालीमठ उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपवन संरक्षण अधिकारी जी. पी. हर्षभानू, सामाजिक वनीकरण …

Read More »

धनगरवाड्यावर ‘ऑपरेशन मदत’तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ चे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी व धनगरवाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न करत आहेत. त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यावरील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यात शिक्षणाची ओढ …

Read More »