Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय 42) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता. …

Read More »

अग्निपथाला विरोधकांनी अग्निकुंड बनविले

एम. बी. जिरली यांची टीका बेळगाव : कारगिल युद्धानंतर भारताच्या तिन्ही सेनादलाच्या विशेष समितीने सैन्य भरती संदर्भात चिंतन करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. सैन्यदलाच्या विशेष समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील तरुणांना सैन्यात सेवेची भरती मिळावी यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. मात्र याच चांगल्या योजनेला अग्निकुंड बनविण्याचे काम विरोधकांनी …

Read More »

हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी …

Read More »

स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणार : संजय घोडावत

बेळगाव : आगामी काळात स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली. बेळगावातील क्लब रोडवरील रेमंड्स शोरूमला शुक्रवारी सायंकाळी स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शॉपिंग करून विविध व्हरायटीचे, डिझाईन्सचे आपल्या आवडीचे कपडे …

Read More »

योग दिनानिमित्त तब्बल 25 तास पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम

बेळगाव : येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमनी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील. काहेर -केएलई अकॅडमी …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर

बेळगाव : येळ्ळूरमधील मुख्य रस्त्यामार्गे गतिरोधक, सिग्नल फलक बसवणे तसेच येळ्ळूर बेळ्ळारी रस्त्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. खानापुर, गुंजी, नंदीहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा या सगळ्या गावातील विटा व वाळू ट्रक टेम्पो व इतर वाहने ये-जा करत असतात त्यामुळे …

Read More »

पाठ्य पुस्तकातील समस्या मार्गी लावा : राजेंद्र पवार वड्डर

शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात …

Read More »

तेऊरवाडीतील शशिकांतला हवा एक मदतीचा हात

बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बळीराजा.. अंगावरच्या घामावर शेतात सोनं पिकवून आपली तीन वेळची अन्नाची गरज भागवणरा तो अन त्याच्या खांद्याला खांदा देऊन राबणारे त्याचे सर्जा अन राजा बैल… पण कधी कधी नियती दगा देते अन त्याच्यावर न पेलावणारं अघटित संकट कोसळतं.. काल बेंदूर वर्षभर काबाडकष्ट …

Read More »

जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते …

Read More »