खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा जंगल भागातील तळावडे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थीनी कुमारी अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशामुळे तिला इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ४८ हजार रूपयाची शिष्यवृत्ती देण्यात …
Read More »हंचिनाळ येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारसौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या …
Read More »शेतकऱ्यांच्या श्रमदानातून कालवा स्वच्छ
बेळगाव : गांधीनगर किल्ला खंदकापासून ते बळ्ळारीपर्यंत जोडणाऱ्या कालव्यातून गवत व झाडे झुडपे, वाढल्याने शिवारात पाणी जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे हा नाला स्वच्छ करण्याची गरज लक्षात …
Read More »हबनहट्टीत लोकसेवा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : हबनहट्टी (ता. खानापूर) व बेळगाव जिल्ह्याचे दक्षिण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हबनहट्टी येथे मलप्रभा नदीवर वसलेले, पंचक्रोशीतील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रात लोकसेवा फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र हबनहट्टीच्या परिसरात पिंपळ, वड, बेलपत्र, पेरू, आंबा अशा वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात …
Read More »बिडीत न्यू नवहिंद मल्टीपर्पजच्या शाखेचा वर्धापन दिन उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बिडी येथे येळ्ळूर येथील न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या बिडी शाखेचा 16 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विनोद पाटील, जवळी मेडिकलच्या सौ. प्रतिभा जवळी, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे खानापूर डिओ सी. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन …
Read More »सीमाभागातील पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन 25 जुलै रोजी
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव यांच्याकडून 25 जुलै 2021 रोजी बेळगाव सीमाभागातील पहिलेच ऑनलाईन संमेलन होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत दिली. दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी (ऑनलाईन) साहित्य संमेलन ऑनलाईन पध्दतीने सकाळी 11.00 …
Read More »काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार
चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …
Read More »कारची झाडाला धडक हिरेहट्टीहोळी गावच्या युवकाचा अपघाती मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड गाववाजवळ स्विप्ट कारची झाडाला जोराची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. सदर युवक खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचा असून याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हिरेहट्टीहोळी येथील युवक राहुल चंद्रकांत हणबर (वय १९) हा आपल्या मित्रासोबत खानापूरात गाडी रिपेरीसाठी सोडली होती. रिपेरी झाल्यानंतर रात्रीच …
Read More »खानापूरात रेशन किट वितरणात सावळा गोंधळ
तहसीलदार कार्यालयासमोर धरणे खानापूर : लेबर कार्डधारकांना रेशन कीट देण्याऐवजी इतर लोकांना सरकारकडून आलेले रेशन किट वितरित करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे बैलुर, कामगारासह यांनी खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले होते.या आंदोलनाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला व तहसीलदार कार्यालय येथे सुरू …
Read More »कचरा डेपो कामाचा नागरगाळीत शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गावाला गायरान नाही, गावठान नाही. शेतकऱ्याच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावित असतानाच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात कचरा डेपो सक्तीने उभारण्यात येत आहे.असाच प्रकार खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्राम पंचायत हद्दीतील जागेवर कचरा डेपो लवकरच उभारण्यात येणार आहे.या कामाचा शुभारंभ तालुका पंचायत कार्यनिवाहक अधिकारी प्रकाश हल्लपणावर यांच्या हस्ते कुदळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta