निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डाॅक्टर, उद्योजक, शिक्षक, समाजीक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लाॅन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली देशमाने यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वैशाली देशमाने या शिक्षिका सध्या गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी येथे …
Read More »साखरवाडीतील नागरिकांच्यावतीने विविध समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन
निपाणी (वार्ता) : साखरवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने साखरवाडीतील नागरिकांनी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना सोमवारी(ता.३०) दुपारी देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, साखरवाडीतील …
Read More »तवंदी घाट दुर्घटनेतील मृतांना निपाणीत श्रद्धांजली
निपाणी (वार्ता) : तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात बोरगाववाडी येथील आदगोंडा पाटील व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांचा मृत्यू झाला. या मृत नागरिकांना दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब आणि व्हॉलीबॉल ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. आदगोंडा पाटील हे निपाणीतील साई शंकर नगरात वास्तव्यास होते. तसेच ते दौलत नगर येथील व्हॉलीबॉल …
Read More »शनेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून साजरी न झालेली शनेश्वर जयंती यंदा सोमवार दि. 30 मे रोजी उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त चौधरी प्यालेस, पाटील गल्ली येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला अनेक रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात के एल ई इस्पितळाचे डॉ. संतोष हजारे, डॉ. विठ्ठल माने, …
Read More »बेळगाव -भुज विमानसेवेला 3 जूनपासून सुरूवात
बेळगाव : बेळगावातून आता अहमदाबाद आणि भुजला थेट जाता येणार असून स्टार एअरकडून बेळगाव ते भुज अशी विमानसेवा येत्या शुक्रवार दि. 3 जून 2022 पासून सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. गुजरातमधील भुज हे शहर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. भारत-पाक युद्धाशी संबंधित …
Read More »बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ
बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …
Read More »कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा 4 हजार रुपये, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
नवी दिल्ली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेची कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात पीएम केअर्स फंडातून मदतनिधी पाठविला. कोरोनामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, जी …
Read More »चक्रतीर्थ यांची पाठ्यपुस्तक समिती रद्द करण्यासंदर्भात बेळगावात निषेध मोर्चा, निदर्शने
बेळगाव : रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. बेळगावातील चन्नम्मा चौकात प्रगतीपर संघटनांच्या वतीने बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने नेमलेली रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याची …
Read More »बापट गल्ली येथील मशिदीसंदर्भात आम. अभय पाटील यांची जिल्हाधिकार्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आत्ता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते. या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली. आपण जिल्हाधिकार्यांना आवश्यक …
Read More »भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta