कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद कोल्हापूर (जिमाका) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या …
Read More »मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे : ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड
खानापूर : सीमालढा अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील जनतेने एकजुटी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच खानापूर समितीने एक सक्षम अध्यक्ष निवडावा ज्याला सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. न्यायालयीन कामकाजाचा अभ्यास आहे. मराठी भाषिकांच्या समस्या परखडपणे मांडणारा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कातला संघटक …
Read More »नाशिकमध्ये साधूंचा राडा
नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड …
Read More »मुख्तार अब्बास नक्वी यांचे राज्यसभेचे तिकीट कापले
लोकसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील दोन उर्वरित जागांसाठीचे उमेदवार घोषित केले असून, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. केंद्रात मंत्रीपदावर राहण्यासाठी नक्वी यांना राज्यसभा किंवा लोकसभा सदस्य असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत …
Read More »खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना रस्ते करून द्या : धनश्री सरदेसाई-जांबोटकर
खानापूर : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गावांना रस्ता तयार करण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना केले. खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना चांगले रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. खानापूर-गोवा रस्त्यापासून चापगाव 5 किमी., पाली 4 किमी, जांबोटी-गोवा मुख्य …
Read More »निर्मला सीतारामन, जग्गेश यांचे उमेदवारी अर्ज दाखल
बेंगळुरू : राज्यसभेच्या दुसर्या टर्मसाठी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते जग्गेश यांनी आज कर्नाटकातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि …
Read More »गॅस दराचा पुन्हा उडणार भडका?
नवी दिल्ली : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात जागतिक बाजारात इंधनाचे भाव कडाडल्याने गॅस सिलिंडरची दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे. नेमकी किती दरवाढ होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल कंपन्यांकडून …
Read More »कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर
इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोर कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून …
Read More »निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघ अजिंक्य
बेळगाव : होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर नुकत्याच आयोजित मुलांच्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील 14 व 16 वर्षाखालील या दोन्ही गटाचे विजेतेपद आरसीसी शिरोडा गोवा या संघाने पटकाविले. सदर निमंत्रितांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आरसीसी शिरोडा गोवा विजया क्रिकेट अकादमी आणि एमसीसी बेळगाव या संघांमध्ये साखळी पद्धतीने खेळविली गेली. त्यामध्ये …
Read More »मळेकरणी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
उचगाव : आपल्या रोजच्या धावपळीतून मोकळा वेळ काढत एक दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित श्री मळेकरणी हायस्कूलमधील सण 1990-91या वर्षांमधील दहावीच्या वर्गातील, बॅचचा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या स्नेहमेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta