संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी प्रसिद्ध चित्रकारांसाठी आपला चार तासांचा बहुमोल वेळ देऊन कलेचा गौरव केला. चित्रकारांनी निसर्गरम्य पत्रिबनात एकाच ठिकाणी तीन तास स्वामीजींना स्थिर बसण्यास भाग पाडत स्वामीजींचे सुंदर पोर्ट्रेट पेंटिंग चित्र रेखाटले. कर्नाटक महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या चित्रकारांना श्रींच्या अनुमतीने सदाशिव कुरबेट यांनी निमंत्रित …
Read More »शैक्षणिक साहित्य महागले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : पालकांच्या खिशाला शैक्षणिक साहित्याचे दर परवडेनासे झालेले दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे पालकांना शैक्षणिक साहित्यावर फारसे पैसे खर्च करावे लागले नव्हते. यंदा मात्र पालकांना शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. वह्या (नोटबूक), कंपास, कलर बाॅक्स, टिफिन बाॅक्स, काॅलेज नोटबूक, …
Read More »युवकांचे ‘दादा’ समितीच्या मुख्य प्रवाहात!
बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी युवकांचे नेते म्हणून परिचित असलेले हिंदुत्ववादी विचारसरणीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. संघटक वृत्तीचा नेता म्हणून परिचित असलेले रमाकांत कोंडुस्कर हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्य प्रवाहात आल्याने मराठी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मागील …
Read More »हुतात्मा स्मारकासाठी मराठी प्रेमींची भरीव देणगी!
बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथे तालुका समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारक उभारणीसाठी बेळगाव तालुक्यासह परिसरातील समितीप्रेमी मराठी बांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर या स्मारकासाठी शिवसेनेकडूनही शक्य तितकी मदत केली जाईल असे आश्वासन अरुण दुधवाडकर यांनी दिले …
Read More »प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे वाहतूक सुरक्षेबाबत बेळगावात बाईक रॅली
बेळगाव : बेळगावात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बुधवारी वाहतूक सुरक्षा उपायांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. बुधवारी बेळगावातील महांतेश नगरात वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे बाईक रॅली काढण्यात आली. या विशेष कार्यक्रमात ब्रह्माकुमारी राजयोगिनी अंबिका, ११ वे जिल्हा व सत्र न्यायाधीश रमाकांत चव्हाण, डीसीपी पी. व्ही. …
Read More »राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुनगार याचे सुयश
बेळगाव : नेहरूनगर येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या अमन अभिजीत सुनगार याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या सहकार्याने एनआरजे केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांनी सदर राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. …
Read More »गुन्हेगारी नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज
बेळगाव : शहर आणि परिसरात काही वेळा गुन्ह्यांचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशा वेळी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला योग्य माहिती द्यावी. अशी सूचना शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. येथील समादेवी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस …
Read More »रत्नशास्त्री मोतीवाला ‘प्राईड ऑफ इंडिया भास्कर’ पुरस्काराने सन्मानित
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार : सामाजिक कार्याची दखल निपाणी(वार्ता) : प्रख्यात रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्या देहावसानानंतर त्यांच्या विद्येचा, सामाजिक कार्याचा वारसा जतन करीत अखंडपणे रत्नसेवेतून जनसेवेचे उत्तुंग कार्य साकारणारे त्यांचे सुपुत्र ए. एच. मोतीवाला यांच्या या क्षेत्रातील अलौकिक कार्याला अनुसरून त्यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने दिला …
Read More »4 जूनपर्यंत उत्तर भागातील वीज पुरवठा खंडीत
बेळगाव : आजपासून दिनांक 4 जून पर्यंत शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव चार दिवस खंडित करण्यात येणार आहे. उत्तर भागात टप्प्याटप्प्याने दुरूस्ती करण्यात येणार असून रोज वेगवेगळ्या …
Read More »बेळगाव आणि हुबळीत क्रिकेटसाठी पोषक वातावरण : माजी क्रिकेटपटू सुनील जोशी
बेळगाव : कर्नाटक राज्यात वर्षभरात विविध शहरात विविध स्तरावरील तब्बल साडेपाच हजार क्रिकेट सामने खेळले जातात. यापैकी 500 सामने धारवाड झोन आयोजित करत आहे. धारवाड झोनमधील बेळगाव आणि धारवाड येथील वातावरण क्रिकेटसाठी पोषक असल्याची माहिती, भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे सदस्य सुनील जोशी यांनी पत्रकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta