Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात

खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज चौथर्‍याचे काम त्वरित पूर्ण करा; शिवसेनेची मागणी

बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकासकाम युद्धपातळीवर हाती घेतले जावे अन्यथा येत्या 5 जुलैपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेने दिला आहे. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि शहर प्रमुख दिलीप बैल्लुरकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त इशाऱ्याचे …

Read More »

सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटपौर्णिमा सोहळा उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : सात जन्मी हाच पती मिळू दे. असे म्हणत वडाच्या झाडाची पुजा करत खानापूरात वटपौर्णिमा साजरी झाली.यावेळी सुवासिनीनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमे दिवशी वडाची मनोभावे पुजा करतात.आज गुरुवारी दि. २४ रोजी खानापूरातील विद्यानगरात वटपौर्णिमेदिवशी वडाची पुजा करण्यासाठी सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी …

Read More »

दहा दिवसांत बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करा!

सर्वोच्च न्यायालयाचे शाळा मंडळांना निर्देश नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. याशिवाय 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसह देशभरातील विविध शिक्षण मंडळांनी बारावीच्या परीक्षा रद्द …

Read More »

रोप लागवड करून शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी साजरी

खानापूर (प्रतिनिधी) :खानापूर तालुका भाजपच्यावतीने खानापूरात रोप लागवड करून शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बुधवारी खानापूरात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.तर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते रोप लागवड केली.कार्यक्रमाला अभियान प्रमुख राजेद्र रायका, कार्यक्रम प्रभारी सुरेश देसाई, माजी जिल्हा पंचायत …

Read More »

श्रमिक अभिवृद्धी संघ (मनरेगा), महेश फौंडेशन व शालीनी फौंडेशनतर्फे मास्क वाटप

बेळगाव : श्रमिक अभिवृद्धी संघ (मनरेगा), महेश फौंडेशन व शालीनी फौंडेशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राहुल पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हुक्केरी तालुक्यातील जारकीहोळी, करीकट्टी, हळेवंटमूरी या गावातील डोंगरावर झाडे लावण्यासाठी खड्डे खणत असलेल्या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या रोजगाराच्या महिलांना व पुरूषांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी …

Read More »

मंत्री शशिकला जोल्लेंची घोटगाळी गावाला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी घोटगाळी (ता. खानापूर) येथील कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या व त्यांच्या कुटुंबाचे धावती भेट देऊन त्यांचे सांत्वन केेले. त्यांच्या कुटुंबाना सरकारी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ उपस्थित होते.

Read More »

मंत्री शशिकला जोल्ले यांना खानापूरात भाजप कार्यकर्त्यांकडून जाब

बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले या अचानक बुधवारी सायंकाळी खानापूर मार्गे बेळगावला जाताना येथील शिवस्मारक चौकात येताच खानापूर भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी मंत्रीमहोदयांच्या ताफ्याला आडवे जाऊन थांबविले व महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांना जाब विचारला. भाजपच्या मंत्री व जबाबदारीम्हणून पक्षाच्या नेत्यांना का कळविले …

Read More »

कसोटीत न्यूझीलंड ‘अजिंक्य’; टीम इंडियाचा ‘विराट’ पराभव!

साउदम्पटन – कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखत पराभव करून पहिलेवहिले कसोटी अजिंक्‍यपद आपल्या नावावर केले. सामन्यात सातत्याने पावसाच्या व्यत्ययानंतरही रंगतदार स्थितीत आलेला सामना कर्णधार केन विल्यम्सन (52) व रॉस टेलर (47) यांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडने सहज खिशात घातला. त्यापूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा …

Read More »

सरकारच्या स्थिरते संदर्भात शरद पवार यांच्या मनात शंका दिसत नाही : संजय राऊत

मुंबई : खासदार शरद पवार यांनी काल दिल्लीतील घरी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली. तिसऱ्या आघाडीबाबत ही बैठक असल्याची चर्चा होती. यातून शिवसेनेला वगळण्यात आल होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या होत्या. आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज खासदार …

Read More »