बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्यासंदर्भात बैठक झाली असून हजारोच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहाण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष शांताराम कुगजी अध्यक्ष येळ्ळूर विभाग समिती येळ्ळूर हे होते. प्रास्ताविक येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस प्रकाश आष्टेकर यांनी केले. भारताचे पहिले सीडीएस प्रमुख जनरल बिपीन …
Read More »मुख्यमंत्र्यांनी बेळगावसाठी विशेष पॅकेज द्यावे : आमदार अनिल बेनके
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे बेळगावातील अनुभव मंडप मॉडेलच्या बांधकामासाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे. बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मंडप उभारणीसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी केली आहे. बेळगावच्या …
Read More »रांगोळी रेखाटून सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली
बेळगाव : कुन्नूर (तामिळनाडू) येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले देशाच्या तीनही संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ त्यांची हुबेहूब रांगोळी चितारून बेळगावचे सुप्रसिद्ध कलाकार अजित औरवाडकर यांनी रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाझर कॅम्प, वडगाव येथील आपल्या ज्योती फोटो स्टुडिओमध्ये विविध रंगाच्या रांगोळीचा सुरेख मिलाफ करून …
Read More »अधिवेशनाची जय्यत तयारी; रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम जोरात
बेळगाव : सोमवार दिनांक 13 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील अनेक कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम आहे जोरात सुरू झालेले पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव शहरात सर्वत्र एलईडी …
Read More »यंदाही नाही जनगणनेचा मुहूर्त!
कोरोना महामारीने शिरगणतीत अडथळे : आता नवीन वर्षाची प्रतीक्षा निपाणी : देशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अद्यापही होऊ शकलेली नाही. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नसून सलग दुसर्या वर्षी जनगणना होणार नसल्याचे चित्र निपाणी तालुक्यात …
Read More »निपाणी तालुक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान : कडक सुरक्षा बंदोबस्त
निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शुक्रवारी (ता. 10) उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. नगरपालिका वगळता निपाणी तालुक्यात प्रत्येक गावात अत्यंत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने शांततेत मतदान पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निपाणी नगरपालिकेसह निपाणी तालुक्यातील सर्व …
Read More »भाजपाचे महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीत बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, महांतेश कवटगीमठ यांना जिल्ह्यात सर्वत्र चांगले मतदान झाले आहे. किमान 1500 मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित आहे. …
Read More »महामेळाव्यासाठी व्हॅक्सिन डेपो येथे पाहणी
बेळगाव : कर्नाटक सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन दि. 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्याचदिवशी महामेळावा भरविण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा महामेळावा भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी म. ए. समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी …
Read More »निपाणीत वकिलाच्या घरी धाडसी चोरी
नऊ तोळे सोन्यासह 17 हजाराची रोकड लंपास : घराचे कुलूप तोडून चोरी निपाणी : येथील खोत गल्लीतील रहिवासी आणि सुप्रसिद्ध वकील अॅड. महेश बसवराज दिवाण यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल 9 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 71 हजार असा एकूण सुमारे 5 लाखांचा ऐवज …
Read More »विधान परिषद निवडणुकीत राज्यात विक्रमी 99.8 टक्के मतदान
बंगळूर : कर्नाटकातील 20 विधान परिषद मतदारसंघातून 25 सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी 99.8 टक्के विक्रमी मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, 2015 च्या विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. कोलार मतदारसंघात सर्वाधिक 99.9 टक्के आणि विजापुर येथे सर्वात कमी 99.55 टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच निवडणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta