Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वर येथील बुरुड गल्लीत जोर लगाके हैसा…

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १० मधील बुरुड गल्लीतील गटार सांडपाण्याने तुंबून राहिल्याने प्रभागातील नागरिकांतून ओरड केली जात होती. त्याची दखल घेऊन आज गटार साफ करण्यासाठी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका सौ. सुचिता एस. परीट यांचे पती पिंटू परीट स्वतः पुढे सरसावलेले दिसले. पालिकेला गटार साफ करण्यास वारंवार सांगून देखील पालिकेचे सफाई कामगार फिरकेनासे झाल्याने आज पिंटू परीट स्वत: गटार स्वच्छतेच्या कामासाठी पुढे सरसावलेले पहावयास मिळाले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी स्थायी समिती सभापती पिंटू परीट म्हणाले, लोकांना स्वच्छतेविषयी वारंवार सांगून देखील फारसा उपयोग होईनासा झाला आहे. लोक विशेष करुन महिला घरातील केरकचरा घंटा गाडीला न देता गटारीत फेकून देतात त्यामुळे गटारी सांडपाण्यांने आणि कचऱ्यांने तुंबून राहू लागल्या आहेत. गटार साफ करण्याचे काम थोडे विलंब झाले तर लोकांची ओरड सुरू होते. संकेश्वर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी जोपर्यंत संकेश्वरचे नागरिक आणि महिला उचलत नाहीत. तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार आहे. संकेश्वर पालिकेने घरातील केरकचरा संग्रहित करण्यासाठी घंटा गाडीची व्यवस्था केली आहे. गृहिनींनी घंटा गाडीला घनकचरा देऊन पालिकेच्या स्वच्छता अभियानाला हातभार लावायचे आहे. घनकचरा गटारीत फेकून देणेचे कार्य कोणीही करु नये. गटारीत कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्या फेकून दिल्या जात असल्याने गटारी तुंबून राहत आहेत. त्यामुळे गटारी साफ करणे तसे जिकीरीचे होऊ लागले आहे. संकेश्वर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांनीच उचलायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *