Sunday , July 26 2026
Breaking News

श्रमिक अभिवृद्धी संघ (मनरेगा), महेश फौंडेशन व शालीनी फौंडेशनतर्फे मास्क वाटप

Spread the love

बेळगाव : श्रमिक अभिवृद्धी संघ (मनरेगा), महेश फौंडेशन व शालीनी फौंडेशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राहुल पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हुक्केरी तालुक्यातील जारकीहोळी, करीकट्टी, हळेवंटमूरी या गावातील डोंगरावर झाडे लावण्यासाठी खड्डे खणत असलेल्या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या रोजगाराच्या महिलांना व पुरूषांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कोरोनाच्या आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षेसाठी उच्च दर्जाचे N95 मास्क व सर्जिकल मास्क वाटप करण्यात आले, यावेळी त्यांनी रोजगाराच्या महिलांनी व पुरूषांनी कोरोनाला न घाबरता सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. यावेळी पद्मप्रसाद हुली व सुनिल कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना बेळगांवमध्ये अडचणीच्या आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले व अन्नदात्या शेतकऱ्यांचे आभार मानले. अडव्याप्पा कुंबरगी व कविता मुरकूट्टी या मान्यवरांनीसुद्धा रोजगारावरील कामगारांना आपल्या कामासंदर्भात व मास्क वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वांनी सरकारी मार्गसुचीचे पालन करुन नरेगा कामगरांना मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी पंचायत चेअरमन व गटप्रमुखांची मोलाची मदत झाली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *