Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; 14 ड्रोन तर 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

  बेळगाव : आज शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्थेच्या संदर्भात विशेष काळजी घेऊन तयारी केली आहे. श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आम्ही आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहोत. नियमांचे पालन करा …

Read More »

श्री मराठा संस्थेचा वर्धापन दिन : वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा; अध्यक्ष प्रशांत नाईक

  निपाणी (वार्ता) : सामान्य कुटुंबातील नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा सौहार्द संस्थेने वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्था आणि संचालकावर सर्वसामान्य ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. ही संस्था नागरिकासाठी असून पुढील काळात शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवकांना आर्थिक बळ देत स्वावलंबी घडविणे …

Read More »

शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडा; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन

  बेळगाव : मागील दहा दिवसापासून बेळगावसह परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रानंतर बेळगाव येथे गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जन होणार आहे. बेळगाव येथील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह गोवा, महाराष्ट्र येथील लोक देखील आवर्जून बेळगावात येत असतात. …

Read More »

गणेश विसर्जनानिमित्त रहदारी मार्गात बदल!

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान रहदारीत होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी रहदारी मार्ग बदलांची माहिती जाहीर केली आहे. मिरवणूक दरम्यान शहरात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक बंद असणार आहे. मिरवणुकीचा मार्ग नरगुंदकर भावे चौकापासून सुरू होणारी मुख्य मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, …

Read More »

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत विविध उपक्रमांनी शिक्षक दिन निपाणी (प्रतिनिधी) : पहिली गुरु आई असली तरी खऱ्या अर्थाने मुलांना घडविणारे शिक्षकच असतात. आज अनेक जण विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, त्यामागे शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवारी होणार!

  बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी तज्ञ समितीची बैठक होणार आहे. सदर बैठक दुपारी ३ वाजता समिती कक्ष क्रमांक पाच, सातवा मजला मंत्रालय, मुख्य इमारत येथे आयोजित केली आहे अतिथीगृहात होणार आहे. सदर बैठक तज्ञ समितीचे अध्यक्ष तथा लोकसभा सदस्य श्री. …

Read More »

बेळगावात रविवारी ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ वितरण

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी बडोदा येथे झालेल्या 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता …

Read More »

संजीवीनी फौडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी ‘उमंग २०२५’ गायन, नृत्य स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : संजीवीनी फौडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून संजीवीनी जेष्ठ नागरिकांसाठी उमंग या नृत्य व गायनाच्या स्पर्धांचे आयोजन करीत असून यावर्षीही 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गायन, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य अशा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रथम या …

Read More »

बीम्स रुग्णालयात धक्कादायक प्रकार; चक्क एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीकडून रुग्णांवर उपचार

  बेळगाव : बेळगावच्या बीम्स रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चक्क एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीने रुग्णांवर उपचार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. मूळची कारवार येथील सना शेख नावाची एक तरुणी स्वतःला पदव्युत्तर शिक्षणाची विद्यार्थिनी असल्याचे सांगून रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती रुग्णालयाच्या सर्जिकल …

Read More »

संत मीरा, सेंट जोसेफ, सेंटपॉल, भरतेश, डीपी शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

  बेळगांव : गणेशपुर रोड येथील गुडस शेफर्ड शाळेच्या टर्फ मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय प्राथमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनच्या दिवशी संत मीरा, सेंट जोसेफ, सेंटपॉल, भरतेश, डीपी शाळेच्या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने …

Read More »