Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

  बेळगाव : महाराष्ट्र्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी भागातील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी मार्गदर्शन केले. राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, रणजित हावळानाचे, अभिजीत मजुकर, परशराम शिंदोळकर, दीपक गौंडाडकर, मनोहर शहापूरकर, महेश पाटील, रोहित वायचळ, शिवाजी उचगावकर, नितीन …

Read More »

समाजसेवक सुधीर नेसरीकर यांनी वृद्ध महिलेला मदत करून दाखवली सामाजिक जाणीव

  संजीविनी वृद्धांना आधारची मदत बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि संजीवीनी फौंडेशनचे हितचिंतक सुधीर नेसरीकर हे सकाळी फिरायला गेले असता आदर्शनगर येथे त्यांना एक वृद्ध महिला एका ठिकाणी बसलेली दिसली त्यांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण ती आपले नाव आत्तापत्ता सांगण्याच्या परिस्थितीत न्हवती. ती मनोरुग्ण असल्याचे समजताच लागलीच त्यांनी …

Read More »

आंब्याच्या स्थीर किंमतीसाठी सिध्दरामय्यांनी मागितली केंद्राची मदत

  बंगळूर : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ‘गंभीर संकटा’मुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना हस्तक्षेप करून आंब्याच्या किंमती स्थिर करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. “मे ते जुलै या हंगामात, मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक झाल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात,” असे सिद्धरामय्या यांनी चौहान यांना लिहिलेल्या …

Read More »

योगेश गौडा हत्याकांड प्रकरण; आमदार विनय कुलकर्णी यांनी न्यायालयात केले आत्मसमर्पण

  ताब्यात घेऊन पाठविले सीबीआय कोठडीत बंगळूर : धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येतील आरोपी माजी मंत्री आणि आमदार विनय कुलकर्णी आज न्यायालयाला शरण आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता आणि त्यांना एका आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात, ते लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात …

Read More »

आंतरराष्ट्रीय सुपर कप फुटबॉल स्पर्धेत बेळगावचा एमएसडीएफ संघ उपविजेता

  बेळगाव : बँकॉक येथे झालेल्या बँकॉक इंटरनॅशनल सुपर कप 2025 बारा वर्षाखालील मुलांच्या निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ फुटबॉल स्पर्धेने नेत्रदिपक कामगिरी करताना स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात एमएसडीएफ फुटबॉल संघाने बारसा फुटबॉल क्लब सिंगापूर संघाचा 2-1 असा पराभव केला. यावेळी एम एस डी एफ संघातर्फे आराध्य …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ ग्रूप, गुजराती नवरात्री उत्सव मंडळ व कँटोनमेंट बोर्डच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिक मुक्तिचा संदेश

  बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप आणि गुजराती नवरात्री उत्सव मंडळ यांच्यामार्फत कँटोनमेंट विभागातील दुकानदार, घरगुती महिला, पोलीस कर्मचारी, जीआटी इंजिनियरींग काॕलेजचे विद्यार्थी, मॉर्निंग वॉकर्स तसेच ग्रामिण भागातील कष्टकरी मजूर, शेतकरी, यांना दररोज भाजीपाल्यासाठी उपयोगी येणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्वच्छता विभाग आणि उद्यान विभाग कामगारांमध्ये …

Read More »

चमत्कार! विमान दुर्घटनेत विमानाला आग लागून राख झाली, मात्र भगवत् गीता ही जशी आहे तशी राहिली…

  अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान काही सेकंदातच मेघाणीनगर परिसरात कोसळले आणि भीषण स्फोट झाला. इतका भयानक होता की, विमानाचे लोखंडदेखील वितळले, आणि प्रवाशांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे. शोधकार्यादरम्यान, बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे, भगवद्गीता …

Read More »

‘मार्कंडेय’ साखर कारखाना राजकीय व्यक्तीच्या घशात घालण्याच्या हालचाली

  बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना लीजवर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, बेळगाव जिल्ह्यातील एका बड्या राजकीय व्यक्तीच्या हातात हा कारखाना सोपवण्यासाठी संचालक मंडळातील काही संचालकांनी गडबड सुरू केली आहे. 7 जून रोजी संचालक मंडळातील काही सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या घरी जाऊन …

Read More »

विमान अपघातात मृत्यू झालेल्या नर्सबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केरळमधील अधिकारी निलंबित

  नवी दिल्ली : अहमदाबादमधील विमान अपघातात 250 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. ज्यामध्ये विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृत प्रवाशांमध्ये केरळमधील एका नर्सचाही समावेश होता, ती नोकरीनिमित्त लंडनला जात होती. मात्र तिचा …

Read More »

बेळगावमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या प्रतीक जोशी यांनी संपूर्ण कुटुंब गमावले

  बेळगाव : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात बेळगावमधील केएलईचा माजी विद्यार्थी प्रतीक जोशी यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले. राजस्थानचे रहिवासी असलेले डॉ. प्रतीक जोशी, त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसह मृत्युमुखी पडले. डॉ. प्रतीक जोशी हे बेळगाव केएलईमध्ये वैद्यकीय विद्यार्थी होते. त्यांनी २००० ते २००५ च्या बॅचमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले …

Read More »