Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

रेशन दुकानदाराविरोधात राजहंसगड गावात एकजूट!

बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान पंचकमिटी मार्फत चालविण्यात यावे असे सर्वानुमते ठरले असताना येथील एका राजकीय वरदहस्त लाभलेल्या गृहस्थाने सदर रेशन दुकान आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करून घेतल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. राजहंसगड येथील रेशन दुकान हे गावपंचांच्या नावाने होते. मात्र एका व्यक्तीने सदर दुकान …

Read More »

१८ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर एसीबी छापे

७५ ठिकाणी शोध मोहीम, अनधिकृत मिळकत, कागदपत्रे ताब्यात बंगळूर : लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) ने बुधवारी राज्यातील सर्वात मोठी कारवाई सुरू केली आणि कथित बेहिशोबी मालमत्ता (डीए) प्रकरणी १८ अधिकाऱ्यांवर छापे टाकले. अतिरिक्त महासंचालक, एसीबी, सीमांत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, एसीबीच्या १०० अधिकाऱ्यांचे पथक ३०० कर्मचाऱ्यांसह ७५ ठिकाणी शोध घेत आहेत. …

Read More »

युद्धात मध्यस्थी करा : बार असोसिएशनची पंतप्रधानांना विनंती

बेळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा, अशी विनंती वजा मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. …

Read More »

सांबरा येथे 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरुध्द कुर्डुवाडी आखाड्याचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार वि. मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अरुण भोंगार्डे, …

Read More »

अमरदीप संस्थेत वनस्पती आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

माणगांव (नरेश पाटील) : आदिवासी समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याकरिता मुंबई प्रांत संचलित हेल्थ प्रमोशन संस्थाकडून दक्षिण रायगड जिल्हा विभागाचा मेळावा मंगळवार दिनांक 15 रोजी पार पडला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष फादर रॉकी बान्स(मुंबई), सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील(पेण), फा. डायगो (नागोठणे), फा. रुडोल्फ(रोहा) तसेच अमरदीप संस्थेच्या अध्यक्षा रुबिन ताई(माणगांव)उपस्थित होते. या मेळाव्याचा …

Read More »

बेळगांव जिल्हा गोंधळी समाज अध्यक्षपदी संदिप गोंधळी यांची निवड

संकेश्वर (प्रतिनिधी) : नुकतीच गोकाक माऊराई देवस्थान सभाभवनमध्ये अखिल कर्नाटक गोंधळी समाजाची सभा घेऊन त्यात नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान अखिल कर्नाटक गोंधळी समाजाचे राज्याध्यक्ष विठ्ठल गणाचार्य यांनी भूषविले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा घेऊन बेळगांव जिल्हा गोंधळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बेळगांव जिल्हा गौरवाध्यक्षपदी सिध्दप्पा इंगवे तर …

Read More »

निलावडे ग्रा. पं. हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये खर्चून करण्यात आला. यासाठी निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर व माजी ग्राम पंचायत सदस्य ओमाणी पाटील यांच्या प्रयत्नाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिमेंट काँक्रीट …

Read More »

खानापूर शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईईचे होणार मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी संचालित शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईई मार्गदर्शनाची सोय होणार आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली. खानापूर येथील शांतिनिकेतन काॅलेजात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सचिव प्रा. आर. एस. पाटील म्हणाले की, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेना सामोरे जाण्यासाठी अकरावी, बारावीपासून गुणात्मकतेला प्राधान्य देणे …

Read More »

आम आदमी पार्टीचे कम्प्युटर उतारासंदर्भात खानापूर तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कम्प्युटर उताऱ्यासंदर्भात नेहमीच शेतकरीवर्गाना, सामान्य नागरिकांना आडचण होत आहे. कम्प्युटर उतारा मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढताना, शेतीच्या कामासाठी कॅप्यूटर उतारा वेळेत मिळत नाही. त्यामुळे सर्व जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने …

Read More »

संकेश्वरात मुलांचा शिमगा चालू…

संकेश्वर (प्रतिनिधी) : उद्या गुरुवार दि. १७ रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असल्यामुळे आज संकेश्वरात मुले-मुली युवक सार्वजनिक होळीसाठी टिमक्यांच्या निनादात घरोघरी जाऊन शिमगा करीत शेणकूट लाकडे, सरपण आणि देणगी गोळा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी कुटुंबातील घरांत शेणकूट, सरपण तर मोजक्याच घरांत लाकडे सार्वजनिक होळीसाठी मिळताना दिसली. प्रत्येकाच्या घरात आज …

Read More »