बेंगळुरू : हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने पीडितेला ११ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. केआर नगर येथील एका घरकामगारावर बलात्कार आणि अपहरण केल्याच्या प्रकरणात जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी आढळले आहेत आणि आता बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने ही शिक्षा …
Read More »चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ५ आरोपींना अटक
बेळगाव : मोटारसायकलवरून येऊन नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला बेळगाव जिल्ह्यातील नेसरगी पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी लोकांचे पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून पळून जात असत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी त्यांचे कौतुक केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील …
Read More »विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार तुरमुरी, कल्लेहोळ, कोणेवाडी, बाची, बसरीकट्टी, अष्टे, चंदगड, खणगांव आणि मुचंडी मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी बेळगाव, खानापूर, निपाणी भागातील जवळपास …
Read More »श्री जोतिबा मंदिर येथे उद्या विविध कार्यक्रम….
बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगांव येथे श्रावण मासानिमित्त जोतिबा मंदिराच्या वतीने रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. सदर यज्ञा निमित्त सकाळी ७ वाजता श्री नाथांस रुद्र अभिषेक पुण्यवचन, गणपती पूजन, शक्ती पीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्र पीठ पूजन, …
Read More »१० दिवसांत पीक कर्ज वाटप न केल्यास आंदोलन!
मुतगा पीकेपीएस विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून मुथागा पीकेपीएसकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलेले नाही. १० दिवसांत कर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुतगा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. आज श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुतगा येथील शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना …
Read More »कर्नाटकातील निवृत्त क्लर्ककडे कोट्यवधींचे घबाड; नावावर २४ घरे, ४० एकर जमीन अन् महागड्या गाड्या
कोप्पळ : कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील सरकारी क्लर्ककडे कोट्यवधींचे घबाड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या क्लर्कला महिन्याला १५००० रुपये पगार होता. या क्लर्कच्या घरी छापा टाकल्यानंतर कोट्यवधींचे घबाड सापडले. क्लर्क हा सरकारच्या कोप्पळमधील ग्रामीण पायाभूत सुविधा विकास मर्यादित या सरकारी कंपनीत कार्यरत होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो महिना १५ …
Read More »पत्रकारिता सोपी झाली मात्र, पत्रकारांवरील जबाबदारी वाढली : प्रवीण टाके
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा बेळगाव : बदलत्या युगात पत्रकारितेत बरेच बदल घडत आहेत. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता सहज सोपी झाली असली तरी पत्रकारांवरील जबाबदारी वाढली असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात …
Read More »कन्नडसक्ती तात्काळ थांबवा; मराठी भाषिक माजी नगरसेवकांची पालिका आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : सध्या बेळगाव महानगरपालिकेत चालू असलेली कन्नडसक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना ऍड. अमर …
Read More »नंदगडवासीयांना अपुऱ्या बससेवेचा फटका; जीव मुठीत घेऊन प्रवास!
खानापूर : खानापूर तालुक्यातील बससेवा अनियमित असल्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या गैरसोयीकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे नंदगडवासीयांच्या समस्या ऐकणारेच कोणी नाही अशी काहीशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. नंदगड येथील विद्यार्थी व नागरिकांना अनियमित बस सेवेमुळे …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी
खानापूर : सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात तसेच मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, यासंदर्भात विचारविनिमय करण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta