बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील आपल्या तलाव पुनरुज्जीवनाच्या तिसऱ्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या प्रकल्पामुळे या गावात शाश्वत जलसंवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्यास फाउंडेशनतर्फे सुळगा येथील 3.5 एकर क्षेत्रात विस्तारलेला तलाव पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेण्यात आले …
Read More »जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बस पलटून 17 ठार
जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर कघोट परिसरात एक बस पलटी झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन या अपघातात एकूण 17 प्रवासी ठार झाले तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही …
Read More »रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लक्ष्मण सिद्राय गोमानाचे व निर्मला गोमानाचे या दांपत्याच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या …
Read More »महापुरुषांचे विचार हाच परिवर्तनाचा राजमार्ग : डॉ. राजश्री तुडयेकर
कराड (प्रतिनिधी) : कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक मध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच संवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम यथा सांग संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती च्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह शिगेला बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पासून संपूर्ण शहर शिवमय होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपती शिवाजी उद्यान येथे …
Read More »अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर निपाणीत कोट्यवधींची उलाढाल
सोन्याचे दर वाढूनही ग्राहकांचा खरेदीवर जोर निपाणी (वार्ता) : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी केली. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने-चांदीचे दर दुप्पट होऊनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अक्षय तृतीया सणादिवशी नवीन दागिने आणि नवीन वस्तू घरामध्ये घेण्याकडे अनेकांचा कल दिसून …
Read More »सकल मराठा समाज बेळगावतर्फे श्री शिवजयंती भक्तीभावात
बेळगाव : बेळगावातील सकल मराठा समाजातर्फे आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. श्री शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय …
Read More »निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती निमित्त मिरवणूक
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शिव बसव प्रतिमेची शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, विजय पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेला १०.६९ कोटींचा निव्वळ नफा
संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी; ६७५ कोटींच्या ठेवी निपाणी (वार्ता) : प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांमुळे महात्मा बसवेश्वर संस्थेच्या ठेवी ६७५ कोटीवर गेल्या आहेत. मार्च अखेर ९५.१८ टक्के वसुली करून संस्थेला १० कोटी ६९ लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. रविवारी आयोजित संस्थेच्या कार्याच्या …
Read More »मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयराजे यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शिवाजी चौकात पताके लावण्यासह आकर्षक विद्युत रोषणाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta