Sunday , August 23 2026
Breaking News

कुद्रेमनीत 20 लाखांच्या सी.सी. रस्त्याच्या कामाचे पूजन संपन्न

Spread the love

 

मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या फंडातून 150 मीटर रस्ता मंजूर

कुद्रेमनी : बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार व महिला आणि बाल विकास, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुद्रेमनी गावातील नाईकवाडी ते बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील 150 मीटर लांबीचा सी. सी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.

आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी 20 लाख रुपये निधी मंजूर केला असून या 150 मीटर सी.सी. रस्त्याचे पूजन ग्राम पंचायत अध्यक्ष विनायक पाटील व शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपक पाटील यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले.

सदर रस्ता कुद्रेमनी गावातील नाईकवाडी मुख्य रस्ता असून, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी पूर्ण केली आहे. या कामाचे ठेकेदार बाळकृष्ण पाटील हे आहेत.

याप्रसंगी रवी पाटील, अरुण देवण, धोडिंबा पाटील, बाळू कदम, शिवाजी गुरव, जोतिबा बडसकर, भरमाणा लोहार, केदारी गोवेकर, लक्ष्मण धामणेकर, लक्ष्मण कागणकर, रोहण पाटील, परशू नाईक व यल्लाप्पा नाईक यांच्यासह नाईकवाडी व कुद्रेमानीतील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेहमीच निधी उपलब्ध करून दिला आहे. नाईकवाडीतील हा मुख्य रस्ता झाल्याने शाळकरी मुले, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय होणार आहे,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नाईकवाडी परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आमदार तथा मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

१५ दिवस शवागृहात असलेल्या अनोळखी मृतदेहाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप

Spread the love  बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *