बेळगांव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो. यांच्यातर्फे 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धा ओम नगर शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या. ह्या स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अशोक घागवे व कल्लाप्पा शहापूरकर उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर व विश्वनाथ येळ्ळूरकर यांचा ही सन्मान करण्यात आला. बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विजेते स्केटर्स पुढील प्रमाणे
प्निश्मिता वाडकेरी 2 सुवर्ण, विहा पालनकुडे 2 सुवर्ण, विघ्नेश गोटे 2 सुवर्ण, रेयांश वाके 2 रौप्य, प्रणव जाधव 2 सुवर्ण, शौर्वा नाझरे 2 रौप्य, शिवकन्या पाटील 2 सुवर्ण, दिव्या बेनाल्ली 2 रौप्य, पलक पट्टणकुड 2 सुवर्ण, हर्षवर्धन दड्डीकेरी 2 सुवर्ण, तश्वी कुलकर्णी 2 सुवर्ण, तन्वी कलकुंद्रीकर 2 सुवर्ण, राशी जाधव 2 रौप्य, समृद्ध बानी 2 सुवर्ण, सम्राज मराठे १ रौप्य १ कांस्य, अभित कांबळे 1 रौप्य, 1 कांस्य, हृवन उमराणी 2 सुवर्ण, शिवांश दड्डी 2 रौप्य, जितेश बेनल्ली 2 सुवर्ण, रियांश हुक्केरी 2 रौप्य, सोहनी चौगुले 2 सुवर्ण, आरुष बोरगल्ली 2 सुवर्ण, प्रणव माळी 2 सुवर्ण, सिया चौगुले 2 सुवर्ण, सौरभ साळोखे 2सुवर्ण, सोहम हवल 2 रौप्य, आदर्श नायक 2 कांस्य, जान्हवी तेंडुलकरला 2 सुवर्ण, आर्या कदम 2 सुवर्ण, सुफियान शहाबादी 2 रौप्य, निवीर दोडामणी 2 कांस्य, आरोही महारनूर 2 सुवर्ण, एलियाना रोनाडीस 2 रौप्य, अमाया रॉड्रिग्स 2 कांस्य, धैर्यशील 2 सुवर्ण, जैनिक शा 2 रौप्य, श्रीश चौगुले 2 कांस्य, दीनवा पाटील 2 सुवर्ण, श्रैया २ रौप्य, एंजल फर्नाडीस 2 कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण, अनया पाटील 2 रौप्य, रुद्रांश गावडे 2 कांस्य, सावी 2 सुवर्ण, श्रीशा दरेकर 2 रौप्य, श्रीशा सोरटे 2 कांस्य, विराज सुनवे 2 सुवर्ण, कुबेर शापूरकर 1 कांस्य, रिधम चव्हाण 1 कांस्य, रोहन बागवान 2 सुवर्ण, अलेशन देसाई 2 रौप्य, ग्रंथ काकतकर 2 कांस्य, आलेया उप्पर 2 सुवर्ण, सोमराणी 2 सुवर्ण, प्रणिता मोटेकर, 2 रौप्य, मनोश्री वंशे 2 कांस्य, शल्या तारळेकर 2 सुवर्ण, श्रेयश बजंत्री 2 रौप्य, ब्लॉसम रॉड्रिग्स 2 सुवर्ण, तन्वी मोहिते 2 सुवर्ण, राही निलाज 2 रौप्य, इथन रॅमंडिस 2 सुवर्ण, जानवी दुधाळ 2 सुवर्ण, युग हेंज 2 रौप्य, साबिया शहाबादी 2 कांस्य विश्वतेज पवार 2 सुवर्ण, विहान चव्हाण 2 रौप्य, अभिनव गोंगळे 2 कांस्य, आरशान माडीवाले 2 सुवर्ण, विराज 1 रौप्य, भाग्यराज पाटील 2 सुवर्ण, राजवीर गुरव 2 रौप्य, एव्हरिल मोरेस, सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 2 रौप्य, राही निलाज 2 कांस्य.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, कृष्ण कन्हैया होसमानी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, अजित शिलेदार, सुरज शिंदे, आशुतोष, दृष्टी कुडाळे या व इतर अनेक जणांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta