Sunday , August 23 2026
Breaking News

अर्धवट कामासह विकास कामांच्या मागणीचे राजेंद्र वडर यांचे मंत्री जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर सतीश जारकीहोळी यांची भोज जिल्हा पंचायतचे माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. यावेळी निपाणी तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन वडर यांनी जारकीहोळी यांना दिले.
यमकनमर्डी येथील मंत्री सतीश
जारकीहोळी यांच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत राजेंद्र वडर पवार यांनी निपाणी तालुक्यातील विविध समस्या व आगामी काळातील विकासकामांबाबत चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंचहमी गॅरंटी योजनांच्या माध्यमातून महिला, विद्यार्थी आणि गरजू घटकांना मिळणाऱ्या लाभांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली.
तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना बळ देणे, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि विकासाच्या माध्यमातून पक्षाचा जनसंपर्क वाढविणे याबाबत राजेंद्र वडर पवार यांनी मंत्री जारकीहोळी यांच्याशी संवाद साधला. निपाणी व चिकोडी परिसरात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या भेटीप्रसंगी भोज परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *