Sunday , August 23 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे, उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे तर उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेटी सर व संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे मावळचे अध्यक्ष पायगोंडा पाटील यांचा सत्कार डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष वसंत शिंत्रे यांचा सत्कार मुख्य कार्यालयाचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते करण्यात आला.
शाखा संचालक सुदीप मुरदुंडे यांनी, शाखेचा प्रगतीचा आढावा सादर केला. शाखेत 10 कोटी 43 लाखाच्या ठेवी व कर्जे वितरण 5, कोटी 8 लाख व स्व निधी 45 लाख व शाखेची वसुली 95% तसेच तसेच वार्षिक उलाढाल 38 कोटी, 31 मार्चअखेर शाखेत 22 लाख 32 हजार नफा झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुख्य शाखेचे संचालक एस. आर. पाटील, प्रताप पटट्नशेट्टी, अशोक लिगाडे महेश बागेवाडी, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. अदन्नावर, शाखा संचालक युसुफ मुल्ला, देवाप्पा कांबळे, रामगोंडा पाटील, चंद्रकांत खोत, मोहन गोरडे, दत्तात्रय किल्लेदार, बाहुबली मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते शाखा व्यवस्थापक राजेंद्र माळगे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *