Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, …

Read More »

आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी

  बेळगाव : भाजपची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने तसा आदेश जारी केला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करून बसनगौडा यांनी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पक्षाच्या केंद्रीय …

Read More »

जिल्हा – तालुका पंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू

  बेळगाव : राज्यात जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे असे आज बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी सांगितले. या वेळचे तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र …

Read More »

अंबिलगाडा मिरवणुकीवेळी जखमी झालेल्या ‘त्या‘ तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बसवन कुडची येथे सुरू असलेल्या यात्रेनिमित्त अंबिलगाडा मिरवणुकीवेळी गाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर युवक गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पारीश पाटील (वय 27, राहणार बसवन कुडची) असे त्या तरुणाचे नाव आहे. बेळगाव शहारापासून जवळच असलेल्या बसवन कुडची यात्रेनिमित्त काढल्या गेलेल्या आंबिलगाडा मिरवणुकीवेळी पारीश पाटील गाडीच्या चाकाखाली …

Read More »

उर्मिला शहा यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

  शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : हरवत चाललेला आपलेपणा, नात्यातली संपत चाललेली ओल वगैरे हक्काच्या आकाशात अन अवकाशात जपता आलं पाहिजे असं सांगणाऱ्या भावगर्भ कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने सोमवार दि. २४ मार्च रोजी जागतिक कविता दिनानिमित्त कवयित्री उर्मिला …

Read More »

राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान महत्वाचे : डॉ. सोनाली सरनोबत

  कुसमळी-खानापूर येथे हळदीकुंकू कार्यक्रम खानापूर : कुसमळी-खानापूर येथील जीर्णोद्धारित महालक्ष्मी मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील, भाजप राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, पंडित ओगले, ग्रामपंचायत अध्याक्ष सौ. आरोही पाटील, मेघा कदम, अनंत सावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. …

Read More »

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) : उदगीर शहरातील मध्यवस्तीत कापड मार्केट गल्ली आणि त्यास लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कापड दुकानांविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकार रामबिलास आर. नावंदर खेरडेकर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली माजी पंतप्रधान देवेगौडा, केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांची भेट

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. राज्याच्या राजकारणात अनेक वाद सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी रात्री जेवणाच्या बहाण्याने नवी दिल्ली येथे …

Read More »

विजयपूरच्या तरुणीची बेळगावात आत्महत्या…

  बेळगाव : एमबीएची पदवी पूर्ण करून कंपनीत प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणीने बेळगाव येथील पीजीमध्ये ऐश्वर्या नामक तरूणीने आत्महत्या केली आहे. विजयपूर येथील एक युवती एमबीए झाल्यानंतर कामानिमित्त बेळगावात रहायला आली आणि नेहरू नगर येथील पीजीमध्ये राहत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती एका कंपनीत प्रशिक्षण घेत होती. मात्र अचानक तिने …

Read More »

शिवमूर्ती विटंबना दंगल प्रकरणी १२ जणांवरील खटला रद्द

  बेळगाव : बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्यानंतर बेळगावमध्ये निषेध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी सरकारी वाहनांवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली कॅम्प आणि खडेबाजार पोलीस स्थानकात ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १२ जणांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत उच्च …

Read More »