Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

ऑस्ट्रेलियाला लोळवत भारत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये!

  दुबई : अखेर भारताने आयसीसी वर्ल्डकप २०२३ फायनलचा बदला घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग …

Read More »

युवतीची निर्घृण हत्या करून प्रियकराची आत्महत्या….

  बेळगाव : शहापूर नाथ पै चौक शहापूर येथील एका घरात एका युवतीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची निर्घृण घटना आज संध्याकाळी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, येळ्ळूर येथील प्रशांत कुंडेकर नामक तरूण हा नाथ पै चौक येथील ऐश्वर्या लोहार (वय १८) या युवतीवर प्रेम करत होता. सदर …

Read More »

संध्या कुलकर्णी यांना ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार -2025’

  बेळगाव : अतिशय जुनी परंपरा असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ व अग्रेसर भारत संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त येत्या शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी भारतातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार 2025’ पुरस्काराने सन्मानित …

Read More »

कारागृहातील मोबाईल जामर विरोधात हिंडलगा ग्रामस्थांचा रास्ता रोको

  बेळगाव : हिंडलगा परिसरातील जनजीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहातील मोबाईल जामरची वाढवलेली रेडियस क्षमता कमी करावी अशी वारंवार मागणी करून देखील कारागृह व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ हिंडलगा ग्रामपंचायतीचे नाराज पदाधिकारी, विविध संघटना आणि गावकरी यांच्यातर्फे कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर आज मंगळवारी सकाळी रास्ता रोको …

Read More »

घरकुल वृद्धाश्रमातर्फे बेळगाव ते प्रयागराज दुचाकी प्रवास अनुभवकथन

  बेनकनहळ्ळी स्थित घरकुल वृद्धाश्रम येथील श्री दत्त देवस्थानचे पुजारी श्री उल्हास अनंत जोशी हे नुकतेच आपल्या टीव्हीएस XL१०० दुचाकीवरून ४५०० किमी प्रवास करून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यास जाऊन आले. महाकुंभ येथे आलेले त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याचकडून ऐकण्यासाठी रविवारी सायंकाळी घरकुल वृद्धाश्रम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी घरकूलचे …

Read More »

संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवले; अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा…

  मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. शेवटी आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. …

Read More »

राज्याच्या विकासाची गती, अधिक मजबूत आर्थिक स्थिती

  राज्यपाल गेहलोत; ‘हमी’मुळे आर्थिक व्यवस्था बिघडल्याच्या आरोपाला चोख उत्तर बंगळूर : हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील आर्थिक व्यवस्था बिघडली आहे, विकासाला धक्का बसला आहे, या विरोधकांच्या आरोपांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या माध्यमातून सरकारने चोख उत्तर दिले. राज्य सरकारच्या हमी योजनांमुळे राज्यातील विकासाला कोणताही धक्का बसला नाही. आर्थिक परिस्थिती बिघडलेली नाही, …

Read More »

राज्यपालांचे अधिकार केले कमी; भाजप-धजदचा राज्य सरकारविरुद्ध निषेध

  बंगळूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सोमवारी निदर्शने केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि त्यानंतर लगेचच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमदारांच्या घरापासून विधानसभेपर्यंत निषेध मोर्चा काढला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि शिकारीपुराचे आमदार बी. वाय. विजयेंद्र, कर्नाटक …

Read More »

माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध नाही : व्यावसायिक अंबी यांचा खुलासा

  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणाबाबत आता व्यापारी बसवराज अंबी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा माझ्या अपहरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध …

Read More »

रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

  मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून सरकारमधील दोन मंत्र्‍यांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन रस्सीखेंच सुरू असून अंतर्गत कुरघोडी असल्याची देखील चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार नाराज असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत …

Read More »