Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव परिसरात विविध उपक्रम

  बोरगाव (वार्ता) : सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरिहंत उद्योग समूह आणि उत्तम पाटील युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव आणि परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदारसंघातील उत्तम पाटील प्रेमी नागरिकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून बोरगाव येथील आर. …

Read More »

सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात

  बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून संगीत प्रशिक्षक विनायक मोरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एम्. बी. नरसन्नवर होते. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. मराठी विषयाच्या प्रा. कल्पना धामणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक …

Read More »

गौतम बुद्धांचे विचार जिवंत केल्याने जग बुद्धमय

  व्याख्याते जगदीश ओहाळ; निपाणीत बौद्ध धम्म परिषद निपाणी (वार्ता) : महात्मा गौतम बुद्धांनी देशाला शांतीचा संदेश दिला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिखाण करून त्यांचे विचार नव्याने जिवंत केल्याने संपूर्ण जग बुद्धमय होत आहे. त्याची जाणीव ठेवून प्रत्येकानी बौद्ध धम्म …

Read More »

चव्हाट गल्लीतील श्री चवाटा मंदिरात होळी उत्सवाची जय्यत तयारी

  बेळगाव : बेळगावातील चव्हाट गल्ली येथे सालाबादप्रमाणे होळी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत पार पडणार आहे. चव्हाट गल्लीतील ग्रामस्थ, पंचमंडळी, चवाटा युवक मंडळ तसेच समस्त युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी चंद्रग्रहणामुळे कार्यक्रमाच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला असून सर्वांच्या सहमतीने …

Read More »

गुंतवणुकीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती महत्त्वाची

  सुनील शेट्ये ; ‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सहकारी संस्थांमध्ये स्पर्धा वाढली असून विश्वस्त मंडळाची जबाबदारी मोठी आहे. समाजातील गरजवंतांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे काम पतसंस्थांच्या माध्यमातून होत आहे. सध्या कर्ज वसुलीचे आव्हान मोठे असतानाही महात्मा बसवेश्वर संस्थेच्या योगदानामुळे संस्था प्रगती पथाकडे झेप घेत आहे. आता बँकांमध्ये …

Read More »

कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूलच्या मुलांनी तयार केला बोलीभाषा शब्दकोश

  बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूल, कॅम्प शाळेतील मुलांनी गेली दोन वर्ष शोध घेऊन बेळगाव परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील शब्द, वाक्प्रचार हा शब्दांचा अमुल्य ठेवा ऋणानुबंध हे शिर्षक देऊन. हस्तलिखित ग्रंथाद्वारे जपून ठेवण्याचा अभिनव उपक्रम करून मराठी राज भाषा दिनी प्रकाशन सोहळा पार पडला. भाषाप्रेमी, तसेच भाषा अभ्यासकांना सुद्धा …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने मराठी भाषेबद्दल चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्याद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन

  बेळगाव : विज्ञान विषय हा केवळ वाचनाचा नसून अनुभवातून समजणारा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार परशराम पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. या …

Read More »

शेतकऱ्यांना द्राक्षे दराचा गोडवा, ग्राहकांना मात्र आंबटच

  निपाणी बाजारात द्राक्षांची आवक; उत्पादन घटल्याने ऐतिहासिक दर निपाणी (वार्ता) : निसर्गाच्या तडाख्याने यंदा द्राक्ष खायला काय, बघायलासुद्धा मिळणार नाही… अशी स्थिती होणार असल्याचे बोलले जात होते. त्याचा प्रत्यय आता यायला लागला आहे. अथणी, कागवाड, मिरज, खंडेराजुरी परिसरात अवघे ६० टक्के उत्पादन येणे दृष्टिपथात असल्याने मागणीच्या तुलनेत निपाणी परिसरात …

Read More »

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई , सहकार्यवाह शिवराज पाटील, डॉ. सुरज शेट्टी व डॉ. हिमा देशपांडे उपस्थित होते. यावेळी डॉ. …

Read More »