Thursday , August 27 2026
Breaking News

बस स्थानकात पडलेले खड्डे बुजवल्याने चालक, वाहकासह प्रवाशातून समाधान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या निपाणी येथील बसस्थानक आवारातील विविध फलाटांवर पडलेले खड्डे अखेर आगार प्रशासनाने बुजवले आहेत. अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येमुळे बस चालकांसह प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बसस्थानक परिसरात अस्वच्छतेचेही साम्राज्य पसरले होते. पंचहमी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आगाराने याची दखल घेत बस स्थानकातील खड्डे बुजवली आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.
वर्षभरापूर्वी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. बस चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचा धोका वाढत होता. तसेच प्रवाशांना
बसमध्ये चढ-उतार करतानाही अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
पंचहमी कमिटीचे तालुका अध्यक्ष रमेश जाधव, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी बसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी आगार प्रशासनाची कानउघडणी करत तातडीने उपाययोजना करण्याचीमागणी केली. त्यानंतर झालेल्या तालुका पंचहमी कमिटीच्या बैठकीत आगार व्यवस्थापक संगप्पा आणि वाहतूक नियंत्रक आर. ए. शास्त्री यांना जाब विचारण्यात आला होता. यावेळी खड्डे बुजवणे, गटारी स्वच्छ करणे, परिसरातील अस्वच्छता दूर करणे, जल कुंभाला नळ बसवणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.
या पाठपुराव्याची दखल घेत खड्डे बुजवण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक पुरस्काराबद्दल निपाणीत डॉ. एन. डी. जत्राटकर यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *