Thursday , August 27 2026
Breaking News

घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर आणि बी. के. बांडगी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील प्रत्येक मराठी माध्यम शाळेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मे महिन्याच्या अखेरीस करण्याची योजना आहे. त्यासाठी बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूल मधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी आपले अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह दि. 16 मे पर्यंत बाळू किल्लेकर, घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी किंवा अनंत लाड, आनंद एडवर्टाइजिंग, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली बेळगाव येथे आणून द्यावेत, असे आवाहन अध्यक्ष कुलदीप भेकणे व कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

एकच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सतीश जारकीहोळींचा पूर्णविराम

Spread the love  ‘जनसेवेसाठी विशिष्ट पदाची गरज नाही’; विरोधकांकडून राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचे भांडवल बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *