Thursday , August 27 2026
Breaking News

बोरगांववाडी सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभ

Spread the love

 

निपाणी‌ (वार्ता) : बोरगाववाडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निडसोशी येथील दूरदुंडेश्वरमठाचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारत्न उत्तम पाटील यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावरील मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. उत्तम पाटील यांनी, देव हा सर्वत्र असून तो ओळखता आला पाहिजे. प्रत्येक कामात देव असून त्याला कामातून व्यक्त करा. साधू संतांच्या सर्व सात राहिल्याने जिवनसुखी बनत असल्याचे सांगितले. पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांनी, जीवनात नेहमी चांगला व्यक्तीची संगत करावी. चराचरात देव असून दिवसातील काही वेळ तरी देवा समोर नतमस्तक झाले पाहिजे. तरच जीवनाचे सार्थक होईल असे सांगितले.
याप्रसंगी मंदिर कमिटी तर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुनील खोत उपाध्यक्ष, प्रकाश गुरगुळे, संजय टाकमारे, जयबजरंग गुळगुळे, रवी गुळगुळे शिवाजी हवालदार, अनिल खोत, भाऊ खोत, प्रशांत गुळगुळे आदर्श करजगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, व भाविक संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन भक्तिभावाने हा सोहळा यशस्वी केला.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक पुरस्काराबद्दल निपाणीत डॉ. एन. डी. जत्राटकर यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *