
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथील नवीन प्राचार्यपदी श्री. प्रदीप पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य श्री.सुभाषराव ओऊळकर, तसेच शाळेच्या एस्.एम्.सी कमिटीचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, डॉ. डी. एन. मिसाळे, डॉ. तेजराज काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य प्रदीप पाटील यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या काही दिवसांत शाळेच्या शिस्तीत आणि कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शाळेच्या प्रत्येक विभागाचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यपद्धतीत त्यांनी घडवून आणलेल्या ‘ड्रास्टिक’ बदलांमुळे संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
श्री. प्रदीप पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील तब्बल २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी दावणगेरे, कोल्हापूर आणि तेरदाळ येथील नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे, ते CBSE नवी दिल्ली येथे ‘रिसोर्स पर्सन’ आणि ‘अफिलिएशन कमिटी’चे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा ज्योती सेंट्रल स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta