बेळगाव : सौंदत्ती येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक दुकानदारांचा जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप करत सौंदत्ती येथील दुकानदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात निदर्शने करत संताप व्यक्त केला. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर येथील प्राधिकरणाचे प्रशासकीय अधिकारी अशोक दुडगुंटी यांनी लमाणी समाजाच्या महिलांना जातीवाचक शब्द वापरून अपमानीत केले. त्यांच्या विरोधात स्थानिक दुकानदारांनी निषेध …
Read More »पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 10 कोटी अनुदान मंजूर : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
बेळगाव : बेळगाव येथील नियोजित पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेंगळुरू नंतर बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा देण्यात आली असून त्याची पायाभरणी करण्यात …
Read More »ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा 16 ते 21 एप्रिलपर्यंत
ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक – महाराष्ट्र सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा बुधवार दिनांक 16 रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर बांधून सुरुवात करण्यात आली. यात्रेचा मुख्य …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर कार अपघात प्रकरणी ट्रक चालक ताब्यात
बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला झालेल्या अपघातप्रकरणी कारला धडक देऊन पळून गेलेल्या ट्रक चालकाला जेरबंद करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. मधुकर कोंडीराम सोमवंशी (६५) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. कारचालक शिवप्रसाद जी. तक्रारीवरून ट्रक चालकास अटक करून ट्रक जप्त करण्यात आला आहे. मंत्री लक्ष्मी …
Read More »इयत्ता पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी वयोमर्यादेत सवलत; कर्नाटक शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बेंगळुर : पालकांच्या मागणीनंतर कर्नाटक शासनाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी वयोमर्यादेत तात्पुरती सवलत दिली आहे. शिक्षण खात्याने पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण होण्याची अट घातली होती. पण आता शिथिलता आणून ती आता 5 वर्षे 6 महिने वय पूर्ण आणि युकेजी (UKG) पूर्ण केलेली मुले यावर्षी …
Read More »मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून; धामणे येथील घटना
बेळगाव : दोन भावांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन हाणामारीत होऊन परिणामी मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजता धामणे गावात घडली. लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) हे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे, तर मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) हा आरोपी आहे. …
Read More »बेळगावात भाजपची जनआक्रोश यात्रा
बेळगाव : बेळगावात आज भाजपच्या वतीने काँग्रेस सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश यात्रा’ काढण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, देशातील कोणत्याही उद्योजकाला जमणार नाही अशी संपत्ती आणि कर्तबगारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडिया ट्रस्ट’च्या माध्यमातून साध्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक तपास धोरणामुळे …
Read More »श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस उत्साहात साजरा; गावात दोन दिवस आनंदोत्सव
बेळगाव : बिजगर्णी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. देवीसमोर केक कापून भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. गावात दोन दिवस पाळणूक ठेवण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर देवीचा भंडारा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी “ओटी भरण्याचा” सोहळा विशेष आकर्षण ठरला. महिलांनी …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठ समितीचा निपाणी, बेळगाव, खानापूर परिसरात दौरा कोल्हापूर : बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत राखीव जागांसह अनेक सवलती देण्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरवात केली आहे. यंदाही या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक शिष्टमंडळाने सीमाभागातील विविध ठिकाणांना भेटी …
Read More »मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत पै हॉटेलच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या कामगाराचा शोध सुरू आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta