Sunday , September 20 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जातीवाचक अपशब्द; स्थानिकांची निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : सौंदत्ती येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक दुकानदारांचा जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप करत सौंदत्ती येथील दुकानदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात निदर्शने करत संताप व्यक्त केला.

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर येथील प्राधिकरणाचे प्रशासकीय अधिकारी अशोक दुडगुंटी यांनी लमाणी समाजाच्या महिलांना जातीवाचक शब्द वापरून अपमानीत केले. त्यांच्या विरोधात स्थानिक दुकानदारांनी निषेध व्यक्त करत अशोक दुडगुंटी यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना स्थानिक दुकानदाराने सांगितले की, आमच्यापैकी कोणीही विकासाला विरोध केलेला नाही मात्र अशोक दुडगुंटी यांनी जातीवाचक अपशब्द बोलून लमानी समाजाच्या महीलान अपमानीत केले आहे. त्यामुळे त्यांनी लमाणी समाजाची माफी मागावी व प्रशासनाने त्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा आपण त्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊन निंदेचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच लमाणी समाजाच्या महिलांनी सांगितले की, अशोक दुडगुंटी यांनी आपल्याला नाहक त्रास दिला आहे तसेच आमच्या समाजावर अन्याय करत अपमानास्पद वागणूक दिली आहे त्यामुळे त्यांनी आपल्या समाजाची जाहीर माफी मागावी व त्यांची प्रशासनाने तात्काळ बदली करावी असा आग्रह यावेळी धरण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *