Sunday , June 7 2026
Breaking News

अथणी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीची आत्महत्या; एक ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : अथणी तालुक्यातील कोडगनूर गावात आई-मुलाच्या हत्येप्रकरणी अथणी पोलिसांनी खुनाच्या संशयिताला अटक केली असून, आणखी एका संशयिताने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (४२) यांची गेल्या रविवारी निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह उसाच्या मळ्यात फेकल्याचा तपास करणाऱ्या अथणी पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले. तालुक्यातील शेगुणसी गावातील सुरेश रामाप्पा सौन्दत्ती हा मृत चंद्रव्वा यांच्या बहिणीच्या मुलीचा पती मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. गावात पोलीस आल्याची बातमी समजताच लपून बसलेल्या सुरेशने गळफास लावून आत्महत्या केली. याच गावातील आणखी एक आरोपी श्रीशैल होरट्टीने पोलिस आल्याची बातमी समजताच उसाच्या मळ्यात लपून गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले.

कौटुंबिक मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहारातून ही दुहेरी हत्या घडवून आणल्याचा संशय आहे. या खून प्रकरणाचा अद्याप कोणताही सुगावा लागला नसला तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात अथणी पोलिसांना यश आल्याने पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

आदित्यराज संस्थापकावर लूकआऊट नोटीस; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love  बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून कंपनीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *