Thursday , April 23 2026
Breaking News

सौंदत्तीमध्ये बेकायदेशीर खाणकाम करताना दगड कोसळून एकाचा मृत्यू

Spread the love

 

सौंदतत्ती : काल रात्री सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी येथे बेकायदेशीर उत्खनन करताना दगड कोसळून एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी येथे बेकायदेशीर उत्खनन करताना एका मोठ्या दगडाखाली अडकून अर्जुन चुलके (५२) यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाले असून टेकडी कोसळल्यानंतर बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्यांनी लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. मृत व्यक्ती माती गोळा करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सौंदत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *