Monday , September 21 2026
Breaking News

सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानात अतिक्रमण हटाव कारवाईला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

Spread the love

 

सौंदत्ती : सौंदत्ती येथील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा देवी देवस्थान परिसरातील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, प्राधिकरणाच्या आयुक्तांना मंदिरातच अडवण्यात आले.
सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लम्मा देवी देवस्थानाच्या आवारातील अनधिकृत गाळ्यांवर आज अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई श्री रेणुका यल्लम्मा विकास प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. सरकारने सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानाचा तिरुपती मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याचा संकल्प केला असून, त्याअंतर्गत विविध टप्प्यांमध्ये सुधारणा व विकासकामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज देवस्थानाच्या आवारातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. व्यापाऱ्यांनी प्राधिकरणाच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घातला, तसेच आयुक्त अशोक दुडगुंटी यांना मंदिरातच अडवून संतप्त प्रतिक्रिया दिली. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *