Sunday , July 26 2026
Breaking News

पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 10 कोटी अनुदान मंजूर : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील नियोजित पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेंगळुरू नंतर बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा देण्यात आली असून त्याची पायाभरणी करण्यात आली आहे. तसेच इमारतीची ब्ल्यू प्रिंट आधीच तयार करण्यात आली आहे. बांधकामाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी मंत्र्यांसमवेत दोन ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात आली. पण ती दोन्ही ठिकाणे शहरापासून लांब आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामागील जुनी इमारत पाडवून तेथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *