Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

“जय महाराष्ट्रा”च्या घोषणा दिल्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवा..

  बेळगाव : अनगोळ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “जय महाराष्ट्र” अशा घोषणा दिल्या जात असताना बेळगाव दक्षिणचे आमदार व महापौरांनी निषेध करण्याऐवजी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलणाऱ्या कन्नड समर्थक …

Read More »

तिबेटला भूकंपाचा तडाखा; 53 जणांचा मृत्यू

  तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले. परंतु भूंकपाचा केंद्रबिंदू तिबेट होता. या भूकंपात किमान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 …

Read More »

दोडहोसुर नजीक दुचाकीची झाडाला धडक; एक जागीच

  खानापूर : दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आढळल्याने झालेल्या भीषण अपघातात रायबाग तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी खानापूर – पारीश्वाड मार्गावर, दोडहोसुर व यडोगा क्रॉस नजीक घडली आहे. सावंत निंगाप्पा शॅंडगे (वय …

Read More »

शासन आणि समाजानेही पत्रकारांच्या समस्यांचा गंभीरपणे विचार करावा : डॉ. गणपत पाटील यांचे प्रतिपादन

  बेळगाव : विविध प्रश्नांवर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. असल्याचे प्रतिपादन सिनेनिर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. गणपत पाटील यांनी बोलताना केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून …

Read More »

सावगावच्या तलाठ्याकडून जिवंत व्यक्तीची मृत म्हणून नोंद : जिवंत असूनही सरकारी सुविधांपासून वंचित

  बेळगाव : सावगावच्या तलाठ्यांनी जिवंत व्यक्तीची मृत अशी नोंद केल्याने सदर व्यक्तीचे आधारकार्ड ब्लॉक झाले आहे. जिवंत असूनदेखील सरकारी सुविधांपासून हे वंचीत आहेत. तलाठ्याच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करणाऱ्या व्यक्तीने न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव गावात आजोबांचा मृत्यू दाखला देण्याऐवजी गावातील तलाठ्यांनी नातवाला मृत घोषित केले. त्यामुळे …

Read More »

एचएमपीव्ही व्हायरस कोविडसारखा पसरत नाही; आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

  बंगळूर : राज्यात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन प्रकरणे आढळून आल्याने लोकांमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. हा विषाणू कोविड-१९ सारखा संसर्गजन्य नसल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे राज्य सरकारने सोमवारी सांगितले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (डीएमई) जारी केलेल्या निवेदनात जोर देण्यात आला …

Read More »

बंगळूरातील दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’ संसर्ग

  सरकार अलर्ट, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना बंगळूर : शेजारच्या चीनमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर, बंगळूर शहरात देशात प्रथमच ८ महिन्यांच्या आणि तीन महिन्यांच्या मुलामध्ये विषाणू दिसून आला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. आठ महिन्यांच्या बालकाला काही दिवसांपूर्वी ताप आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्त …

Read More »

गणेबैलनजीक दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू

  खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल नजीक, हत्तरगुंजी गावच्या हद्दीत असलेल्या मार्गावर काल रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेला दुचाकी चालक विक्रम मारुती पाटील (वय 33) बादरवाडी (बेळगाव) याचा आज सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता …

Read More »

बाळंतीणी आणि नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणी भाजपच्या सत्यशोधक समितीची बैठक

  बेळगाव : बाळंतीणी आणि नवजात शिशुंच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने पत्रकार परिषद घेतली. शिरहट्टीचे आमदार चंद्रू लमाणी यांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या सत्यशोधक समितीने बाळंतीणी व शिशुंच्या मृत्यू प्रकरणाणांवर प्रकाश टाकत राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिरहट्टीचे आमदार …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे. या बैठकीत हुतात्मा दिन, दिल्ली …

Read More »