Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर ता. पं. कार्यकारी अधिकारी म्हणून दिनेशकुमार मीना यांनी स्वीकारला पदभार

  खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी पदावर प्रबेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर, दिनेशकुमार मीना यांनी तालुका पंचायत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या कारभाराची आणि योजनांची माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सखोलपणे जाणून घेतली. या बैठकीत तालुका पंचायतीचे …

Read More »

मतदान केंद्र येती घरा….

  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच होय. मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे …

Read More »

बस वेळेत सोडण्यासंदर्भात गर्लगुंजी येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन

  गर्लगुंजी : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे बस वेळेवर येत नसल्याने या गावातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. शेवटी आज या गावातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी गर्लगुंजी येथे रास्ता रोको करून दोन बस अडविल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्लगुंजी या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता येणारी बस 10.30 …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने “ॲनिमिया” व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या “ॲनिमिया मुक्त भारत” या राष्ट्रव्यापी आरोग्य अभियानांतर्गत बेळगाव शाखेतर्फे मंगळवारी ॲनिमियावर विशेष व्याख्यान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नीता देशपांडे तसेच गौरवान्वित अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अरूण जोशी उपस्थित होते. सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या सहयोगाने हा स्तुत्य …

Read More »

येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने विशेष साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने येत्या 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या विशेष साहित्य पुरस्कारासाठी साहित्यिक, लेखक यांना आवाहन करण्यात येत आहे की सन 2023 पासून कै. गंगुबाई आप्पासाहेब गुरव विशेष साहित्य पुरस्कार देण्यात येत असून, या पुरस्काराचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव हे …

Read More »

बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपासने घेतला जुनेबेळगाव येथील शेतकऱ्याचा बळी

  बेळगाव : गेल्या 2011 पासून आजपर्यंत बेकायदेशीर तसेच शेतकऱ्यांची सहमती न घेता, विरोधी आंदोलन मोडित काढत मा. न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडवत महामार्ग प्राधिकरण खाते पोलिस खात्याच्या मदतीने ठेकेदार हालगा-मच्छे बायपास करण्यात गुंतले आहे. 2011 पासूनते आजपर्यंत या पट्यात अनेकांनी धास्तीने तसेच, आत्महत्या करुन घेत अनेक शेतकऱ्यांनी जिवन संपवले. मच्छे …

Read More »

वक्फ कायदा असंविधानिक आणि अमानवीय : अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

बेळगाव : वक्फ कायदा मुस्लीम आणि कुराण नियमांनुसार लागू होत नाही. याशिवाय, हा कायदा अमानवीय, हीन आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा आहे. वक्फ कायदा त्वरित रद्द करणे आवश्यक आहे, असे कोल्हापूर कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर मठाचे स्वामीजी यांनी सांगितले. वक्फ बोर्ड विरोधात बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी उद्यानात नागरिक हितरक्षण समितीच्या …

Read More »

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा शिल्लक असून आता मतदार जनजागृती व मतदान केंद्रावरील तयारी कामांना गती द्या. मतदानासाठी सर्व मतदान केंद्रे आवश्यक त्या सुविधांनी सज्ज ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात सर्व …

Read More »

मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

  संकेश्वर : हरगापुरगड येथील मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने दारुच्या नशेत घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनिल विश्वनाथ भोसले (वय 30) असे त्यांचे नांव आहे. अनिल याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. काही वर्षापासून तो दारुच्या आहारी गेला होता. दारु पिऊ नकोस म्हणून कुटुंबातील त्याला सांगत …

Read More »

संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास

  संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच तोळ्याचे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता घडली. यामुळे बस स्थानकातील दुबळ्या सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी सौ. अंजना शिवानंद जळके रा. बसवान …

Read More »