Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणाऱ्यास बेंगळुरू येथे अटक

  बेंगळुरू : भारत- पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. यादम्यान पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथून एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. शुभांशू शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. शुक्ला हा गेल्या वर्षभरापासून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ९ …

Read More »

विनोद गायकवाड यांना दमसाचा महादेव मोरे पुरस्कार

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमासा) कोल्हापूर यांच्या वतीने 2024 चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “युगांत” कादंबरीला कै. महादेव मोरे पुरस्कार जाहीर झाला आहे. सीमा भागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमाभागातीलच दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग …

Read More »

स्वतंत्र बलुचची घोषणा, पाकिस्तानचे दोन तुकडे?

  नवी दिल्ली : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ‘आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही’ अशी मोठी घोषणा बलुच नेत्यांनी केली आहे. १४ मे २०२५ रोजी बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बलुचिस्तान …

Read More »

मसूद अझहरला पाक सरकारकडून 14 कोटी मिळणार; पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार?

  कराची : भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूर अंतर्गत मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यातील प्रत्येक व्यक्तीला पाकिस्तानी सरकार १ कोटी रूपये देणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मसूद अझहरला ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान जागतिक दहशतवाद्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत देत दहशतवादाला पुन्हा …

Read More »

मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजबाबतचा आढावा कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री क्षेत्र केदारेश्वर जोतिबा या दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यसह संपूर्ण देशातील भाविकांचा आणि कोल्हापूर वासियांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील सर्व यंत्रणेचे तसेच …

Read More »

तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात मॉक ड्रील : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

    बेळगाव : देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी चिक्कोडी व बेळगाव येथे लवकरच मॉक ड्रीलचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. बुधवारी (१४ मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी …

Read More »

तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने आदर्श माता सन्मान सोहळा शनिवारी

  बेळगाव : तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने मातृदिना निमित्त आदर्श माता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ.शकुंतला गिजरे सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोटरीक्लब ऑफ बेळगाव इलाईट, जननी ट्रस्ट हे आहेत. ज्या …

Read More »

विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे यश बेळगांवच्या खेळाडूंना प्रेरणादायी : रमाकांत कोंडुसकर

  बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद मेत्री यांचे सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचा ब बेळगावच्या विविध संघटनेच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आल. धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर जंगी स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रमुख …

Read More »

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घराच्या मोडतोडीची अफवा

बेळगाव : गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घराची आरएसएस हिंदूं धर्मियांनी तोडफोड केल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणारा अनीस हुद्दिन नावाची व्यक्ती ही मूळची कॅनेडियन असल्याचे कळले आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. ही पोस्ट एक्स या …

Read More »

आक्रम-सक्रम योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड!

    बेळगाव : कर्नाटकातील मतदारांनी सत्ता पालट करून काँग्रेस सरकारला सत्तेत आणले. काँग्रेसला सत्तेत आणण्यात शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र सध्याचे कर्नाटकातील काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्याच मुळावर उठले की काय असे चित्र दिसत आहे. कर्नाटक राज्यातील मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला चार हजार रुपये …

Read More »